Israel Iran Conflict : इराणचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांचा खात्मा ?; इस्रायलचा मोठा दावा

Israel Iran Conflict : इस्रायली हवाई दलांनी सोमवार आणि मंगळवारदरम्यान रात्री तेहरानमधील सेंट्रल भागात केलेल्या हल्ल्यामध्ये शादमानी हे मारले गेले आहेत.

68

इस्रायलने इराणवर कारवाई करतांना ऑपरेशन रायझिंग लायनच्या सुरुवातीला इस्राइलने इराणमधील मोठे अणू शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Israel Iran Conflict) या संघर्षादरम्यान आता इराणच्या आणखी एका बड्या लष्करी अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या सशस्त्र संरक्षण दलांचे नवनियुक्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ (Chief of Army Staff) आणि वरिष्ठ सैन्य कमांडर अली शादमानी (Ali Shadmani) यांना मारल्याचा दावा इस्राइली संरक्षण दलाने (आयडीएफ) केला आहे.

(हेही वाचा – Air India च्या अहमदाबाद-लंडन विमानात पुन्हा मोठा बिघाड, ऐनवेळी विमान रद्द!  )

अली शादमानी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचे निकटवर्तीय सल्लागार होते. आयडीएफने शादमानी यांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, इस्रायली हवाई दलांनी सोमवार आणि मंगळवारदरम्यान रात्री तेहरानमधील सेंट्रल भागात केलेल्या हल्ल्यामध्ये शादमानी हे मारले गेले आहेत. हा हल्ला इस्रायलच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारावर करण्यात आला.

शादमानी हे इराणच्या सशस्त्र दलांच्या एमर्जन्सी कमांड आणि खातम अल-अनबिया (Khatam al-Anbiya) मुख्यालयाचे कमांडर होते. इस्रायलविरोधातील संघर्षात इराणसाठी युद्धाची रणनीती आखण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते, अशी माहितीही इस्रायलने दिली आहे. दरम्यान, १२ जून रोजी इस्रायली सुरक्षा दलांनी ऑपरेशन रायझिंग लायनची (Operation Rising Lion) सुरुवात केल्यावर सुरुवातीलाच मेजर जनरल गोलाम अली रशिद यांची हत्या केली होती. त्यानंतर शादमानी यांची चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Israel Iran Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.