Israel attacks Iran : इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं ! लष्करी आणि अण्वस्त्र तळांना केलं लक्ष्य

Israel attacks Iran : इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं ! लष्करी आणि अण्वस्त्र तळांना केलं लक्ष्य

107
Israel attacks Iran : इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं ! लष्करी आणि अण्वस्त्र तळांना केलं लक्ष्य
Israel attacks Iran : इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं ! लष्करी आणि अण्वस्त्र तळांना केलं लक्ष्य

इस्रायलने (Israel attacks Iran) इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रचंड हल्ले केले आहेत. इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला आहे. तसेच इस्रायलने इराणी लष्करी तळांवर आणि अण्वस्त्र तळांवर हल्ला केला आहे. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. (Israel attacks Iran)

हेही वाचा-Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत महाराष्ट्रातील ७ जणांवर काळाचा घाला !

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी इस्रायल सरकारने इराणच्या निवासी भागात हल्ला केला. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले. त्यानंतर काही वेळातच इस्रायल सरकारने इराणविरुद्ध कारवाई सुरू केल्याची घोषणा केली. (Israel attacks Iran)

इस्रायलमध्ये आणीबाणी, तेल अवीवमध्ये सायरन वाजले
दरम्यान, अमेरिकेच्या ‘एबीसी न्यूज’ वाहिनीवरील एका बातमीत इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणलवर हल्ले केले. यासोबतच इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायलने इराणवर केलेल्या आगाऊ हल्ल्यामुळे नजीकच्या भविष्यात इस्रायल आणि त्याच्या नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होण्याची शक्यता आहे.” त्यांच्या घोषणेनंतर, तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आहेत. (Israel attacks Iran)

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख हुसेन सलामी मारले
अमेरिकेच्या सीबीएस न्यूज चॅनेलच्या बातमीनुसार, शुक्रवारी सकाळी इस्रायली सैन्याने इराणी अणु सुविधा आणि संशोधन शास्त्रज्ञांना लक्ष्य केले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी याला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. इराणी सरकारी टेलिव्हिजनने म्हटले आहे की, या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख हुसेन सलामी मारले गेले. (Israel attacks Iran)

इस्रायलने इराणवर हल्ला करत राजधानी तेहरानला लक्ष्य केले. या हल्ल्याने संपूर्ण तेहरान हादरले. या हल्ल्यात इस्रायलने इराणची अण्वस्त्र केंद्रही उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या हल्ल्याबाबत दावा केला की, इस्रायलने ऑपरेशन सुरु केले आहे. इराणच्या अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलने आपला एअर स्पेस बंद केला आहे. आता ईराणकडून हल्लास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. (Israel attacks Iran)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.