Iran-Israel War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला डिवचलं, म्हणाले…

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मोठा दावा केला आहे. संघर्षा(Iran-Israel War)त आता परराष्ट्रमंत्री अराघची यांनी मोठा दावा करत अमेरिकेला डिवचले असून अमेरिकन सैन्याने इस्त्रायलला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.

66

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मोठा दावा केला आहे. संघर्षा(Iran-Israel War)त आता परराष्ट्रमंत्री अराघची यांनी मोठा दावा करत अमेरिकेला डिवचले असून अमेरिकन सैन्याने इस्त्रायलला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)त अमेरिकेचा काहीही संबंध नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता परराष्ट्रमंत्री अराघची यांच्याकडून मोठा दावा करण्यात येत आहे.(Iran-Israel War)

(हेही वाचा Iran-Israel War : ‘इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त करायचाय, पण…’; लष्करी सामर्थ्य असणाऱ्या इस्त्रायलने अमेरिकेला आवाहन का केले? )

मागील काही दिवसांपासून इस्त्रायलकडून इराणवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलला अमेरिकन सैन्याने पाठिंबा दिल्याचे पुरावे इराणकडे आहेत, असे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले. आमच्याकडे झायोनिस्ट राजवटीच्या लष्करी दलांच्या हल्ल्यांना अमेरिकन सैन्य व प्रदेशातील अमेरिकन तळांचा पाठिंबा असल्याचे ठोस पुरावे आहेत, असे अराघची यांनी सरकारी माध्यमातून प्रसारित झालेल्या एका बैठकीत सांगितले.

(हेही वाचा Iran – Israel War : इराणची नरमाईची भूमिका; चर्चा करण्यास, हल्ले थांबवण्याविषयी दिले संकेत )

विशेष म्हणजे, इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)वरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. जर इराणने आमच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सशस्त्र दलांची संपूर्ण ताकद व सामर्थ्य यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीवर दिसून येईल, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला होता. त्यामुळे आता इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानंतर अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

इराणचे संरक्षण मंत्रालय, अणु प्रकल्पावर इस्रायलचा जोरदार हल्ला

इस्त्रायलने इराणच्या आण्विक कार्यक्रम आणि लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लष्कर प्रमुख, आयआरजीसी प्रमुखांसह दोन शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश आहे. यानंतर इराणने सुद्धा मिसाईल ड्रोनने टार्गेट करत तेल अविवमध्ये हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव(Iran-Israel War) वाढला असून इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराण लष्कर प्रमुख मोहम्मद बघेरी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकारी ठार झाले.(Iran-Israel War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.