Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष(Iran-Israel War) दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. जर इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष(Iran-Israel War) कमी झाला नाहीतर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, उभय देशांमधील संघर्षा(Iran-Israel War)दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(Iran-Israel War)
(हेही वाचा Suzlon Energy Share Price : दोन महिन्यात ५५ टक्के वाढीनंतर ‘हा’ शेअर आता ८ टक्क्यांनी खाली )
दरम्यान, इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)मुळे जागतिक तेल व नैसर्गिक वायू पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या दाव्यामुळे किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांतील भू-राजकीय तणाव तीव्र झाल्यास ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमती प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. तसेच, तणावा(Iran-Israel War)ची परिस्थिती लवकर निवळल्यास बाजार परिस्थिती लवकरच सामान्य होऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे इंधनाच्या किमतींवर लक्षणीय परिणाम झाला. यामुळे कच्च्या तेलाच्या व नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. याचे कारण, पश्चिम आशियात पुन्हा एकदा मोठा संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली. हल्ल्यांनंतर ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल ७८.५ डॉलरवर पोहोचल्या. परंतु, काही कालावधीतच त्या सुमारे ७५ डॉलर प्रति बॅरलवर आल्या.
इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)त जर सौदी तेल, वायू, शिपिंग किंवा रिफायनिंग पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले किंवा ते नष्ट केले गेले, तर सुरुवातीच्या भीतीपोटी केलेल्या खरेदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $१२०, अगदी $१५० च्या वर जाऊ शकतात, असे रॅबोबँक इंटरनॅशनलचे जागतिक रणनीतिकार मायकेल एव्हरी यांनी म्हटले आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला
इराण व इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले असून इराणची अणुऊर्जा रोखण्यासाठी इस्रायलने शुक्रवारी हल्ला केला. इस्रायलने इराणवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी, इराण इस्रायलवर सतत हल्ला करत आहे. इराणने तेल अवीवपासून जेरुसलेमपर्यंत क्षेपणास्त्रे डागली आहेत. या संघर्षात दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.(Iran-Israel War)
Join Our WhatsApp Community