Iran-Israel War : ‘इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त करायचाय, पण…’; लष्करी सामर्थ्य असणाऱ्या इस्त्रायलने अमेरिकेला आवाहन का केले?

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष(Iran-Israel War) दिवसेंदिवस उग्र रुप धारण करताना दिसून येत आहे. इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)नंतर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

72

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष(Iran-Israel War) दिवसेंदिवस उग्र रुप धारण करताना दिसून येत आहे. इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)नंतर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)त आमचा काही संबंध नाही. तसेच, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची मागणीही ट्रम्प यांनी फेटाळून लावली आहे.(Iran-Israel War)

(हेही वाचा Iran-Israel War : दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीत चीनने घेतली उडी; चीनी परराष्ट्र मंत्रालय म्हणाले… )

दरम्यान, इस्त्रायलकडून अमेरिकेला संघर्षा(Iran-Israel War)त सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावर आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुतोवाच केले. सद्यस्थितीस ट्रम्प प्रशासन इस्त्रायलच्या मागणीवर विचार करत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने अॅक्सिओसला सांगितले. तसेच, दोन्ही देशांदरम्यान आज जे काही घडते आहे ते रोखता येणार नाही, असेही इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यासंदर्भात अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराणने अमेरिकेच्या लक्ष्यांवर हल्ला करून प्रत्युत्तर देणे बेकायदेशीर ठरेल. तसेच, संघर्षात आमचा काही संबंध नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.

तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायली अधिकारी काय म्हणाले?

मागील ४८ तासांत इस्त्रायने ट्रम्प प्रशासनाला इराणच्या अणुकार्यक्रम संपविण्यासाठी संघर्षा(Iran-Israel War)त सहभागी होण्यास अमेरिकेला सांगितले. इस्त्रायली अधिकाऱ्याने म्हटले की, आमच्याकडे डोंगराळ व खोल जमिनीखाली असलेल्या इराणच्या फोर्डो युरेनियम समृध्द तळाला नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले घातक शस्त्र व बंकर बस्टर बॉम्बर लढाऊ विमाने नाहीत. महत्त्वाचे म्हणजे इस्त्रायलला हवे असलेले बॉम्बर विमाने इराणमधल्या अमेरिकन हवाई तळांवर आहेत. परंतु, अमेरिकेने आतापर्यंत या संघर्षापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.(Iran-Israel War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.