Iran-Israel War : दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीत चीनने घेतली उडी; चीनी परराष्ट्र मंत्रालय म्हणाले…

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षात आता चीनने उडी घेतली आहे. चीनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी इराण-इस्त्रायल संघर्षावर भाष्य करत चीनची भूमिका मांडली.

93

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षात आता चीनने उडी घेतली आहे. चीनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी इराण-इस्त्रायल संघर्षावर भाष्य करत चीनची भूमिका मांडली. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी इस्त्रायलने इराणवरील केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, तेहरानच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाकरिता इराणला चीनने पूर्ण पाठिंबा दिला आहे.

(हेही वाचा जूनच्या अखेरीस Indian Air Force च्या ताफ्यात येणार Mk 1A तेजस जेट लढाऊ विमाने ! )

दरम्यान, इस्त्रायलने तेहरानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील क्रूर हल्ल्याचा चीनकडून निषेध नोंदविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर चीनने इराणसोबत चर्चा केली असून इराणला पाठिंबा दर्शविला आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. चीन परराष्ट्रमंत्र्यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यंशी फोनवरून चर्चा केली.

 

चीनी परराष्ट्र मंत्रायलयाने काय म्हटले?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे व प्रादेशिक अखंडतेला धक्का पोहोचविला असून याच पार्श्वभूमीवर चीन इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करतो. इराणी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून होणाऱ्या क्रूर हल्ल्यांना चीन ठामपणे विरोध करतो. या हल्ल्यात नागरिकांचे नुकसान झाले असून इराणला त्याच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास, त्याच्या कायदेशीर हक्क व हितांचे रक्षण करण्यास तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यास पाठिंबा देतो,” असे प्रवक्ते लिन जियान यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.