Indo Pak War : पहलगाम हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ने प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान सध्या बिथरला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून पलटवार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्याआधीच भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली आहे. अशातच ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) 15 भारतीय ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) एस-४०० (S – 400) या हवाई संरक्षण प्रणालीने पूर्णपणे हाणून पाडला. एस-४०० हे भारताचे सुदर्शन कवच असल्याचे सिद्ध झाले आहे. (Indo Pak War)
(हेही वाचा – Saharanpur : मदर तेरेसा कॉलेजमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना केले लक्ष्य ; टिळा लावण्यास, पवित्र धागा बांधण्यास मनाई केल्यावर हिंदू संघटना आक्रमक)
पाकिस्तानकडून भारतीय लष्कराचे ‘हे’ 15 तळ लक्ष करण्याचा प्रयत्न
अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज, या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. यासाठी पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला.
(हेही वाचा – प्रीती बंड यांचा Shiv Sena प्रवेश; शिवसेना उबाठाला धक्का)
भारताचं सुदर्शन चक्र, S-400 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय?
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते. हे मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे. भारताने हे मिसाईल रशियाकडून खरेदी केले आहे. हे मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही पाडण्याची क्षमता ठेवते. S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते. ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद
S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते. तसेच ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे. यामध्ये सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली आहे. तसेच या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या. S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. तसेच ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.
(हेही वाचा – कळवा-खारेगावातील माजी नगरसेवकांचा Shiv Sena प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का)
यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात. यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात. एकावेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते. ही सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते. यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community