Indo Pak War : लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय सैन्याने केली उद्ध्वस्त; पाकच्या कुरापतींना प्रत्युत्तर

95

Indo Pak War : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने ७ मे रोजी पहाटेपासून काश्मीर, पूंछ येथे सीमावर्ती भागात गोळीबार केला आणि भारतीय नागरिकांना ठार केले. त्यामुळे ८ मे रोजी सकाळीच मोदी सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक घेतली आणि त्यानंतर भरतील सैन्य दलांना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार भारताच्या सैन्याने पाकिस्तानच्या लाहोर येथील हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून तो उद्ध्वस्त केला. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. (Indo Pak War)

पाकिस्तानची उद्ध्वस्त केलेली HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली काय आहे?
पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. हे चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशन (CPMIEC) ने विकसित केले आहे. पाकिस्तानने २०२१ मध्ये ही प्रणाली त्यांच्या सैन्यात समाविष्ट केली. त्याची रेंज १२५ ते २०० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. त्यात एकाच वेळी १०० लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता आहे.

HQ-9 बद्दलचे सत्य जाणून घ्या
पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पण सत्य हे आहे की हे HQ-9 तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर कुठेही टिकत नाही. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल अशी जवळजवळ कोणतीही शक्यता नाही. एस-४०० ची मारा क्षमता ४०० किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

(हेही वाचा – इस्रायलचा हुथी बंडखोरांवर पुन्हा हल्ला; येमेनमधील Sanaa International Airport बंद)

दहशतवादी हल्ल्याचा बदला
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यापूर्वी भारताने या कारवाईअंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक पर्यटक होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.