-
प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा करारा बदला घेत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत चोख आणि निर्णायक कारवाई केली आहे. मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सीमारेषा ओलांडून विविध भागांतील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनांचे शेकडो अतिरेकी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Operation Sindoor)
अचूक लक्ष्यावर घातक प्रहार
भारतीय हवाई दलाच्या या मोहिमेत अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, सरजल, गुलपूर, बिलाल कॅम्प आणि अहमदपूर फैसलाबाद या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. ही सर्व ठिकाणे अतिरेक्यांच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रसिद्ध होती. हल्ल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवर मोठा विध्वंस झाला असून अतिरेक्यांचे तळ नेस्तनाबूत करण्यात आले. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Gaganyan : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम अंतिम टप्प्यात, अंतराळ राज्यमंत्री म्हणाले…)
सीमारेषा ओलांडून थेट घुसखोरी
भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात घुसखोरी करत ही कारवाई केली. या कारवाईत ‘स्पाइस 2000’ प्रकारच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांकडून समजते. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Operation Sindoor)
‘ऑपरेशन सिंदूर’ : एक नियोजनबद्ध उत्तर
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारत सरकार आणि सैन्य दलांनी मिळून आखलेले एक गुप्त आणि उच्चस्तरीय नियोजन होते. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाचा आणि आक्रोशाचा विचार करून हे अभियान हाती घेण्यात आले. याअंतर्गत दहशतवाद्यांच्या बळकटीच्या केंद्रांवर थेट लक्ष्य साधून निर्णायक हल्ला करण्यात आला. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Operation Sindoor : मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं ! पहलगाम हल्ल्याला भारताचे चोख उत्तर)
देशभरात आनंदाचे वातावरण
भारतीय सैन्याच्या या ठोस कारवाईमुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनीही या कारवाईचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community