Operation Sindoor : भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच आहे. ७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी हवाई हल्ले (Air strikes) करून लष्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर, भारतीय सैन्याने आता सीमेजवळील दहशतवादी लाँच पॅड नष्ट (Pak launch pad destroyed) करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या अड्डा नष्ट केल्याचा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, ‘कदम कदम बधाई जा, खुशी के गीत गये जा… ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटये जा’ हे गाणे वाजत आहे आणि भारतीय सैनिक जड तोफखान्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक-एक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत आहेत. (Operation Sindoor)
OPERATION SINDOOR
Indian Army Pulverizes Terrorist Launchpads
As a response to Pakistan’s misadventures of attempted drone strikes on the night of 08 and 09 May 2025 in multiple cities of Jammu & Kashmir and Punjab, the #Indian Army conducted a coordinated fire assault on… pic.twitter.com/2i5xa3K7uk
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 10, 2025
भारतीय सेनेने एक्स माध्यमांवर प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले. ८ आणि ९ मेच्या रात्री जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त केले. तसेच नियंत्रण रेषेजवळील पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवादी लाँचपॅड हे मागील काळात भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे केंद्र राहिले आहेत. भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor : कॉंग्रेसचे नेते पाकसाठी बनले हिरो; ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल ) शनिवारी सकाळी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांनी एक व्हिडिओ देखील दाखवला. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्य पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट करत आहे. व्हिडिओमध्ये, भारतीय सैनिक पाकव्याप्त काश्मीरमध्ये अचूकपणे लक्ष्यांवर मारा करताना दिसत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त होताना दिसत आहेत आणि हल्ल्याच्या ठिकाणाहून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community