Indian Army : Operation Sindoor अजूनही सुरूच, पाकड्यांवर प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे करडी नजर

Indian Army :  ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अजूनही सुरूच, आम्ही सतर्क आणि दक्ष, अशा शब्दांत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईनंतर भारतीय लष्कराने पुनरुच्चार केला. दि. ०७ मे रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)अंतर्गत भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवाद्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळं आणि १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्कराच्या कारवाईत करण्यात आला.(Operation Sindoor)

443

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) पुढच्या भागात शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केलेल्या प्रगत देखरेख तंत्रज्ञानाचा आधार देण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या एका भारतीय लष्कर अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना प्रशिक्षणाचे आणि तयारीचे महत्त्व स्पष्ट केले.

(हेही वाचा “युद्ध आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठीच रशियाचा वेळकाढूपणा”; युक्रेनचे अध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांचा गंभीर आरोप )

ते म्हणाले, आम्ही २४ तास प्रशिक्षण घेत होतो. शांततेत जितके जास्त घाम गाळू तितकेच युद्धात रक्त कमी वाहिले जाईल. तसेच, जेव्हा आम्ही उद्ध्वस्त करण्यासाठी लक्ष्य निवडत होतो, तेव्हा ते विचारपूर्वक केले गेले होते. ते पुढे म्हणाले, यावेळी शत्रूला ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, ते पुन्हा तीच चूक करण्याची हिंमत करणार नाही. सर्व दहशतवादी लाँचपॅडवर देखरेखीखाली आहेत, असेही लष्करी अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले.

दहशतवादी कारवायांनी चर्चेत असलेल्या आणि कृतींमुळे लक्ष्य करण्यात आलेल्या पूंछमधील सांस्कृतिक सौहार्द अधिक स्पष्ट करताना लष्करी अधिकारी म्हणाले, पूंछ हे सर्व धर्मांच्या संगमावर असून शत्रूला पूंछमध्ये असलेल्या सुसंवादाची जाणीव होती. त्यामुळे केवळ २० मिनिटांतच सर्व काही उलगडले. यावरून पाकिस्तानी सैन्यात व्यावसायिकतेचा अभाव दिसून आला. मुळात, त्यांच्याकडे भारतीय लष्करासोबत लढण्याची ताकद नाही म्हणूनच ते अशी कृत्ये करत आहेत, असेही ते म्हणाले.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.