Indian Army: भारतीय लष्करप्रमुख राजौरी सेक्टरला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमांचा आढावा घेणार

पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

123
Indian Army: भारतीय लष्करप्रमुख राजौरी सेक्टरला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमांचा आढावा घेणार
Indian Army: भारतीय लष्करप्रमुख राजौरी सेक्टरला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमांचा आढावा घेणार

भारतीय लष्करप्रमुख (Indian Army) जनरल मनोज पांडे सोमवारी (२५ डिसेंबरला) राजौरी सेक्टरला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमांचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या वनक्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याने पुंछ जिल्ह्यातील बफलियाज भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी राजौरी सेक्टरमधील थानंडीजवळ लष्कराच्या २ वाहनांवर सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले तर ३ जण जखमी झाले.

भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांनी २१ डिसेंबर रोजी लष्करी तळावर हल्ला केला होता. ज्यात ४ सैनिक ठार झाले होते. गुरुवारी, दुपारी ३.४५ वाजता राजौरीच्या पुंढ भागातील डेरा की गलीमधून जाणाऱ्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून दहशतवादी हल्ल्यांबाबत शोधमोहीम सुरू आहे तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भारतीय लष्कराच्या मुख्यालयाकडूनदेखील अशा प्रकारच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे तसेच या तपासाला पूर्ण पाठिंबा असून आम्ही सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून ‘X’वर पोस्ट करण्यात आली आहे. ४८ राष्ट्रीय परिसरात (48 Rashtriya Rifles area) या प्रकरणाची कारवाई सुरू असल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी, नायक बीरेंद्र सिंग, रायफलमॅन गौतम कुमार, नायक करण कुमार आणि रायफलमॅन चंदन कुमार या ४ हुतात्मा सैनिकांना राजौरी येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.