Indian Air Force: मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांच्या सरावासाठी ‘टायगर ट्रम्फ -24’च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन

भारतीय नौदलाच्या सहभागी युनिट्समध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक, लँडिंग जहाज (मोठे) यांचा समावेश आहे ज्यात त्यांचे एकात्मिक लँडिंग क्राफ्ट आणि हेलिकॉप्टर, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जहाज आणि लांब पल्ल्याच्या सागरी शोध विमानांचा समावेश आहे.

122
Indian Air Force: मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांच्या सरावासाठी 'टायगर ट्रम्फ -24'च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर ) संयुक्त सराव, टायगर ट्रम्फ -24 चा उद्घाटन समारंभ मंगळवार, 19 मार्चला आयएनएस जलश्ववर आयोजित करण्यात आला होता. बहुराष्ट्रीय मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमा हाती घेण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि प्रमाणित कार्यप्रणालीचे नियोजन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (Indian Air Force)

सरावाचा बंदर परिसरातील टप्पा 18 ते 25 मार्च 24 या कालावधीत विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला आहे आणि जहाजांच्या सरावाआधीच्या व्यावसायिक विषयांवर तज्ञांचा विचारविनिमय आणि विविध कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेवर चर्चा यांचा समावेश असेल. दोन्ही देशांच्या सहभागी सशस्त्र दलातील जवानांमधील सौहार्द वाढवण्यासाठी क्रीडाविषयक कार्यक्रम देखील नियोजित आहे.26 ते 31 मार्च 24 या कालावधीतील सागरी टप्प्यात दोन्ही देशांच्या तुकड्यांकडून संयुक्त कमांड आणि नियंत्रण केंद्र आणि संयुक्त मदत आणि वैद्यकीय शिबिराच्या स्थापनेचा समावेश आहे.

(हेही वाचा – MNS : महायुती झाल्यास मनसेला फायदा, पण मतदार पाठिशी किती हे कसे ठरवणार?)

दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जलद आणि सुरळीत समन्वय साधण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणालीवर चर्चा करण्यासाठी एकाच वेळी नियोजन आणि तिला उत्तम स्वरूप देण्यासाठी समन्वय सराव हाती घेतला जाईल.

मध्यम उंचीवरील विमान आणि अमेरिकी मरीन
भारतीय नौदलाच्या सहभागी युनिट्समध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक, लँडिंग जहाज (मोठे) यांचा समावेश आहे ज्यात त्यांचे एकात्मिक लँडिंग क्राफ्ट आणि हेलिकॉप्टर, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जहाज आणि लांब पल्ल्याच्या सागरी शोध विमानांचा समावेश आहे. भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व एक पायदळ बटालियन गट करेल. ज्यामध्ये मॅकॅनाईज्ड रेजिमेंटचा समावेश आहे. भारतीय हवाई दल मध्यम उंचीवरील विमाने, हेलिकॉप्टर आणि जलद कृती वैद्यकीय चमू तैनात करेल याशिवाय तिन्ही सेवांमधील विशेष मोहिमा दल म्हणजेच स्पेशल ऑप्स फोर्सदेखील या सरावात सहभागी होतील. अमेरिकेच्या कृती दलामध्ये अमेरिकी नौदल लँडिंग प्लॅटफॉर्म डॉकचा समावेश असेल ज्यामध्ये त्याचे एकात्मिक लँडिंग क्राफ्ट एअर कुशन आणि हेलिकॉप्टर, एक विनाशिका, सागरी टेहळणी आणि मध्यम उंचीवरील विमान आणि अमेरिकी मरीन यांचा समावेश असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.