पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India VS Pakistan War ) तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. शनिवारी (3 मे 2025) ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानी रेंजरला राजस्थान फ्रंटियर फोर्सने ताब्यात घेतले आहे. (India VS Pakistan War )
हेही वाचा-MegaBlock : रविवारी ‘या’ मार्गावरचा ब्लॉक रद्द ; काय आहे कारण घ्या जाणून …
राजस्थान फ्रंटियरच्या बीएसएफ यूनिटने या पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, तो भारतीय सीमेत कसा आला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. (India VS Pakistan War )
महत्वाचे म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. याच दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. (India VS Pakistan War )
हेही वाचा- Hindu Rashtra : पाकिस्तानचे पत्रकार म्हणतात, भारत हिंदू राष्ट्र बनावे
गेल्या २३ एप्रिलला पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते आणि भारतीय जवानांनी तीव्र विरोध करूनही त्यांनी बीएसएफ जवानाला सोपवण्यास नकार दिला होता. हा मुद्दा भारताने गांभीर्याने घेतला असून पाकिस्तानी रेंजर्सना पूर्णम कुमार यांना तत्काळ सोडण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप, यासंदर्भात पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारची सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. (India VS Pakistan War )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community