India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रात ‘या’ १६ ठिकाणी होणार मॉकड्रील !

India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रात 'या' १६ ठिकाणी होणार मॉकड्रील !

534
India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रात 'या' १६ ठिकाणी होणार मॉकड्रील !
India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रात 'या' १६ ठिकाणी होणार मॉकड्रील !

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (India Vs Pakistan War Mock Drill) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. युद्धाचे ढग तयार होत आहेत. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वत:चा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण देण्यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. (India Vs Pakistan War Mock Drill)

हेही वाचा-India-Pakistan War : कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रील होणार ? सायरन वाजल्यावर काय कराल? सायरन कुठे लागणार? वाचा सर्व काही एका क्लिकवर …

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. (India Vs Pakistan War Mock Drill)

महाराष्ट्रातील पुढील या ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉकड्रील – (India Vs Pakistan War Mock Drill)
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग

पंजाबमध्ये ब्लॅकआउट सराव (India Vs Pakistan War Mock Drill)
संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता अगदीच अटीतटीच्या काळात ‘ब्लॅकआऊट’ करण्याचा उपाय असो अथवा प्रमुख प्रकल्प, प्रतिष्ठित संस्थांसह इतर केंद्रांच्या संरक्षणाच्या उपायांचाही या सरावात समावेश असेल. वित्तीय शिस्तीसाठी असलेल्या योजनांच्या आधुनिकीकरणासह त्याचा सराव करण्याचे निर्देशही केंद्राने अशा राज्यांना दिले आहेत. पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंटमध्ये रविवार-सोमवार रात्री ब्लॅकआउट सराव करण्यात आला. या काळात, गावे आणि परिसरात रात्री ९ ते ९:३० वाजेपर्यंत वीज बंद होती. (India Vs Pakistan War Mock Drill)

मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे काय ?
देशात अशा प्रकारचा शेवटचा मॉक ड्रिल १९७१ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. ही मॉक ड्रिल युद्धादरम्यान झाली होती. मॉक ड्रिल ही एक प्रकारची “प्रॅक्टिस” आहे ज्यामध्ये आपण पाहतो की जर एखादी आपत्कालीन परिस्थिती (जसे की हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ला) झाला, तर सामान्य लोक आणि प्रशासन किती लवकर प्रतिक्रिया देतात. ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे संपूर्ण परिसरातील दिवे ठराविक काळासाठी बंद करणे. जर शत्रू देशाने हल्ला केला, तर अंधारात परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल हे दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. यामुळे शत्रूला लक्ष्य करणे कठीण होते. (India Vs Pakistan War Mock Drill)

सायरन वाजल्यानंतर काय कराल ?
हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत. कारण लाईट सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे. जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय, नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत. जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. याशिवाय, हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरुन जाऊ नये. (India Vs Pakistan War Mock Drill)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.