India Pakistan War : पाक सेनाधिकार्‍यांना युद्ध का हवे आहे?

112
India Pakistan War : पाक सेनाधिकार्‍यांना युद्ध का हवे आहे?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी भारत आणि हिंदूंविरोधात विधान केले. त्यांनी द्वि-राष्ट्रवादाचा सिद्धांत अधोरेखित केला आणि म्हटले की पाकिस्तान आणि भारत धर्म, परंपरा आणि उद्दिष्टांमध्ये पूर्णपणे वेगळे आहेत. यावेली मुनीर यांनी पाकिस्तानची इस्लामी ओळख अधोरेखित केली आणि हिंदू व मुस्लिम वेगवेगळे असल्याचे सांगितले. मुनीर म्हणाले होते की पाकिस्तान कधीही हा काश्मीर हा मुद्दा सोडणार नाही आणि काश्मिरींचे समर्थन करत राहील. काश्मिरचा उल्लेख त्यांनी “jugular vein” “गळ्यातील नस” म्हणजेच जीवनरेखा असा केला. त्यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये इस्लामी जिहादी हल्ला झाला. हा योगायोग मुळीच नाही. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने किंवा प्रोत्साहनाने हा हल्ला झाला होता, हे आता सिद्ध झालं आहे. पाक हा लोकशाही देश नाही. तिथे जसे लोकशाही पद्धतीने सरकार निवडून येते, तसेच सैन्याचे वर्चस्व असते. भारतीय सैन्य आणि पाक सैन्य यांची तुलना करता येत नाही. कारण पाकिस्तानच्या जनतेच्या मते पाक सैन्याला प्रश्न विचारला तर ते आवामवरच अत्याचार करतात. त्यामुळे पाक सैन्य हे तिकडच्या जनतेचे रक्षक नाहीत. ड्रोन हल्ला करण्यासाठी सिव्हिलियन विमानांचा आधार घेण्यात आला होता हे आता स्पष्ट झालं आहे. तसेच भारताने केवळ ऐरेकी अड्ड्यांवर कारवाई केली. मात्र पाक सैन्याने भारतीय जनता, मंदिर, चर्च, गुरुद्वारा यांना लक्ष्य केले होते. हा मूळ फरक आहे पाक सैन्य आणि भारतीय सैन्यामधला. (India Pakistan War)

(हेही वाचा – Operation Sindoor : भारताच्या कारवाईत काय-काय उद्ध्वस्त झालं, तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत दिले पुरावे)

पकिस्तान हे युद्धमान राष्ट्र आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्यशी लढण्याची त्यांची क्षमता नसली तरी युद्धाची खुमखुमी खूप आहे. मुनीर म्हणाले त्याप्रमाणे पाक हे राष्ट्र हिंदू द्वेष्टे आहेत. म्हणूनच पाकिस्तानची हिंदू व इतर अल्पसंख्य जनता हळूहळू नष्ट होत आहे. पाकिस्तानमधील बहुसंख्य जनतेच्या मनात हिंदुस्थानाविषयी चीड आहे. त्यांना आपला हेवा देखील वाटतो की आपण कशी प्रगती केली, विशेषतः मोदींच्या नेतृत्वात आपली जगात चलती आहे. त्यांनाही आपल्यासारखी प्रगती करायची आहे. मात्र प्रगती होत असताना त्यांना हिंदुंना नष्ट देखील करायचे आहे. मात्र पाकिस्तान हा देश कोणत्याच बाबतीत प्रगती करु शकला नाही. आज भिकारी देश म्हणून त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. पाकिस्तानच्या जनतेचा स्वभाव लक्षात घेता तिथल्या सेना अधिकार्‍यांना आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती आवश्यक वाटते. आतंकवाद हा पाकमधला सर्वात तेजीचा धंदा आहे. म्हणून आपली कातडी वाचवण्यासाठी सेनानायक प्रॉक्सी युद्धाचा आधार घेत राहिले आहे. प्रॉक्सी युद्ध म्हणजे थेट युद्ध न करता टोळ्यांना अर्थात अतिरेक्यांना मदत करुन युद्धजन्य वातावरण ठेवणे. यात पाकिस्तानला चांगले यश लाभले आहे. भारताशी केलेल्या सर्वच युद्धात पाकचा पराभव झाला. मात्र प्रॉक्सी युद्धात त्यांना २०१४ आतापर्यंत चांगले यश मिळाले होते. सीमा भागात अतिरेकी कारवाया होतात. पण त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे २६/११ चा हल्ला म्हणता येईल. या हल्ल्यात त्यांनी भारताचे प्रचंड नुकसान केले. परदेशी नागरिकांना लक्ष्य करुन त्यांनी भारताच्या टुरिस्ट पॉलिसीवरच हल्ला चढवला होता. इतके करुनही आपण प्रतिशोध घेतला नाही. सोनिया गांधींच्या चावीने चालणार्‍या मनमोहन सिंह यांच्यामध्ये तेवढी धमक नव्हती. आपलं सैन्य कारवाई करण्यात तरी सुद्धा सैन्याला आदेश देण्यात मनमोहन सिंह यांना सोनिया गांधींच्या चावीची गरज होती. मात्र सलमान खुर्शीद म्हणाले होते त्याप्रमाणे अतिरेक्यांसाठी डोळ्यांत आसवे आणणार्‍या बाईला अतिरेक्यांवर कारवाई करणे अशक्यच होते. या अशा प्रॉक्सी वॉरमुळे पाक सेनाधिकार्‍यांना त्यांचे वर्चस्व टिकवून ठेवण्यास मदत करत होते. (India Pakistan War)

(हेही वाचा – Russia-Ukraine War : भारत-पाकिस्तान तणाव सुरू असतानाच रशिया महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत)

मात्र मुनीर यांनी एक चूक केली. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करणार्‍या मोदींकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी प्रक्षोभक भाषण करुन हिंदू विरोधी गरळ ओकली. द्वि-राष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षितता सुनिश्चित केली. त्यांनी पहलगाम हल्ला म्हणजेच प्रॉक्सी वॉर घडवून आणले. त्यांना वाटले होते की मोदी फार फार तर एखादी स्ट्राईक करतील आणि गप्प बसतील आणि अशी स्ट्राईक झालीच नाही असे सांगून पाक जनतेला पुन्हा मूर्ख बनवता येईल. मात्र यावेळी मोदींनी शांत राहून अचानक रौद्र रुप धारण केलं आणि ९ अतिरेकी अड्ड्यांवर जबरदस्त हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे पाक पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख मुनीर पूर्णपणे बिथरले. अशा हल्ल्यासाठी ते अजिबात तयार नव्हते. भारताने त्यांचे अतोनात नुकसान केले. हा हल्ला ते लपवू शकत नव्हते. पाकिस्तानी जनतेच्या मनात राग होता. भारत आपल्यावर हल्ला करतो आणि आपण काहीच करु शकत नाही. म्हणून पाकने ड्रोन्स डागले. पण भारताने त्यांचे हल्ले परतवून लावले. मात्र या हल्ल्यांना उत्तर देताना भारताने पाकचे आणखी नुकसान केले. विशेष म्हणजे भारत युद्ध करेल या भितीने ४५०० सैनिकांनी आणि २५० अधिकार्‍यांनी राजिनामा दिल्याच्या बातम्या झळकल्या. आपण भारताशी लढू शकत नाही हे पाहताच त्यांनी सिझफायरचा प्रस्ताव ठेवला. सिझफायरही त्यांनी मोडले. मग भारताने आणखी जबरदस्त उत्तर दिले. तिथून गोळी निघाली तर इथून गोळा निघेल, हे तत्व भारत सरकार आणि सैन्याने अवलंबलं. त्यामुळे शनिवारी उशीरा रात्री पाक पंतप्रधानांना मीडिया समोर येऊन फेकाफेकी करावी लागली की ते हे युद्ध जिंकले आहेत. परंतु सोशल मीडियातून हा संदेश गेला आहे की पाक सैन्य घाबरलेलं आहे. (India Pakistan War)

(हेही वाचा – Operation Sindoor : भारताच्या कारवाईत नऊ तळांवरील १०० दहशतवादी ठार, सोमवारी पुन्हा पाकिस्तानच्या डीजीएमओंशी चर्चा; भारतीय सैन्यदलांची माहिती)

स्वतःची कातडी वाचण्यासाठी पाक सैन्याने नेहमीच अतिरेक्यांना साथ दिली आहे. अतिरेकी कारवाया किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन आपणच वाघ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा भ्रष्टाचार, गरीबी, अत्याचार लपवण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे भारताला व हिंदुंना टार्गेट करणे. मात्र पाक सैन्य हे जगातले सर्वात पळपुटे सैन्य आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीतही पाक आपल्याला घाबरला आहे असेच म्हणता येईल. यावेळी पाक सेनाधिकारी स्वतःची कातडी वाचवायला गेले पण त्यांची कातडी सोलून निघाली आहे. पाक सेनाधिकार्‍यांना युद्ध किंव युद्धजन्य परिस्थिती हवीय कारण त्यांना त्यांचे वर्चस्व व अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. मात्र अतिरेकी हल्ला हा युद्धाला प्रोत्साहन मानला जाईल असा पवित्रा मोदींनी घेतला आहे. पुढच्या वेळी आपली कातडी वाचवण्यासाठी पाक सेनाधिकार्‍यांना नवी योजना शोधावी लागणार आहे. नाहीतर पाकमधील गृहयुद्धच त्यांचा अंत करेल! (India Pakistan War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.