India Pakistan War : पाकिस्तानचा स्वार्म ड्रोन हल्ला भारताने कसा केला निकामी ?

India Pakistan War : सुदर्शन ४००च्या क्षमतेसमोर पाकिस्तानने टाकलेली स्वार्म ड्रोन्स अतिशय लहान आहेत. भारताची विमानविरोधी तोफांची यंत्रणा आजही सज्ज आहे.

70

ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या नागरी भागात स्वार्म ड्रोन हल्ला केला. स्वार्म ड्रोन हल्ला (Swarm Drones) म्हणजे ड्रोनच्या झुंडींनी केलेला हल्ला. (India Pakistan War) मधमाशा ज्याप्रकारे झुंडीने आक्रमण करतात, तशा प्रकारे अनेक छोटे छोटे ड्रोन्स वापरून हा हल्ला केला गेला. भारताच्या सुदर्शन ४०० (एस ४००, S 400) ने हे ड्रोन्स नष्ट केले, असे सगळीकडे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तसे नाही.

(हेही वाचा – India Pakistan War : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; चंदीगडमध्ये वाजले आपत्कालीन सायरन)

स्वार्म ड्रोनसाठी विमानविरोधी तोफाच पुरेशा

आपल्याकडे जुन्या काळी विमानविरोधी तोफा होत्या. भारताच्या या तोफा अजूनही कार्यक्षम आहेत. या विमानविरोधी तोफांचा (Anti-Aircraft Guns) उपयोग करून भारताने पाकिस्तानची ती स्वार्म ड्रोन्स नष्ट केली आहेत. या तोफा अत्यंत वेगवान असतात. ड्रोन्स लहान असतात. ती टारगेटवर येऊन पडतात. ती परत जाण्यासाठी नसतात. त्यामुळे ती त्यांच्या लक्ष्यावर पडण्याआधीच विमानविरोधी तोफा वापरून ती नष्ट केली आहेत. सुदर्शन ४००च्या क्षमतेसमोर पाकिस्तानने टाकलेली स्वार्म ड्रोन्स अतिशय लहान आहेत. भारताची विमानविरोधी तोफांची यंत्रणा आजही सज्ज आहे. ड्रोन्स आणि स्लो मूव्हिंग ऑब्जेक्ट्ससाठी विमानविरोधी तोफा आहेत. एस ४०० वापरून मोठी मिसाईल नष्ट केली जाऊ शकतात. त्यामुळे एस ४०० वापरून स्वार्म ड्रोन्स नष्ट केली, असे म्हणणे चुकीचे आहे. यापूर्वी पाकिस्तानने डागलेली सगळी मिसाईल सुदर्शन ४०० ने पाडली, त्यामुळे पाकिस्तान्यांना वाटले की, आपण स्वार्म ड्रोन्स विरोधात सुद्धा सुदर्शन ४०० ही सिस्टिम वापरू. भारताने मात्र या वेळी विमानविरोधी तोफा वापरल्या. भारताने ड्रोन्स पाडल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.

भारताची यंत्रणा जगात भारी

पाकिस्तानकडे असलेले ड्रोन्स तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेले आहेत. तुर्कस्तानकडे (Turkey) ड्रोन्स बनवण्यासाठी जगातले अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाने बनवलेले ड्रोन्सही भारताने निष्प्रभ केले आहेत. यावरून लक्षात येते की, भारताच्या पूर्वीच्या काळातील विमानविरोधी तोफाही किती सक्षम आहेत ! (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.