
भारत आणि पाकिस्तानच्या (India Pakistan War) तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत-पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहे. भारताकडून पाकिस्तानचे तीन एअरबेससह इस्लामाबाद, लाहोरवर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. (India Pakistan War)
This is how Pakistan’s long range missile Fateh-2 was intercepted and destroyed by Barak-8 missile defence system in Sirsa of Haryana. pic.twitter.com/h3R8POwVPh
— India Infra (@IndiaInfra_) May 10, 2025
पाकिस्तानने दिल्लीवर लांब पल्ल्याची फतेह २ मिसाईल डागली होती. पहाटे चारच्या सुमारास ही मिसाईल हरियाणाच्या सिरसाच्या आकाशात पोहोचली होती. ही मिसाईल हरियाणाच्या आकाशात आल्यावर भारतीय सैन्याने एअर डिफेन्सद्वारे ती पाडली आहे. यामुळे दिल्लीवरील मोठा हल्ला परतवून लावण्यात आला आहे. (India Pakistan War)
#Breaking Pakistan’s Fateh II missile launched towards Delhi shot down by Indian Air Force near Sirsa. #OperationSindoor pic.twitter.com/kG0ZXQHQXE
— TJ (@IamTarunJoshii) May 10, 2025
रावळपिंडी स्फोटांनी हादरलं
सिरसामधून अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये मोठा स्फोटाचा आवाज आणि स्फोटानंतरचा प्रकाश दिसत आहे. ही बॅलेस्टिक मिसाईल दिल्लीतील एक अती महत्वाच्या ठिकाणावर लक्ष्य करून डागण्यात आली होती. गेले दोन दिवस भारतावर भ्याड ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती समोर आली. (India Pakistan War)
हवाई वाहतूक बंद
भारताकडून पाकिस्तानमधील चार विमानतळांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून देशातली सारी विमानतळं बंद करण्यात आली आहे. दुपारी बारापर्यंत देशभरातली हवाई वाहतूकच पाकिस्तानने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून पहाटे 3.15 वा.पासून हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. (India Pakistan War)
पाकिस्तानकडून 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली. (India Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community