
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्ट मोड स्वीकारला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या तयारीचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. (India Pakistan War)
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त, नागरी सुरक्षेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (India Pakistan War)
(हेही वाचा – भारतीय चेक पोस्ट उडवले, फियादीन हल्ला, जालंधरमध्ये ड्रोन हल्ला; सगळे काही खोटे; पीआयबीने FACT Check द्वारे केला पर्दाफाश)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी प्रशासनास महत्त्वाचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून मॉकड्रिल्स राबवण्याचे निर्देशही दिले गेले. संभाव्य ब्लॅकआउट (Blackout) परिस्थितीत रुग्णालयांची सेवा अखंड सुरू राहील याची खात्री करण्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (India Pakistan War)
राज्यभरात जनजागृतीसाठी ब्लॅकआउट म्हणजे काय, अशावेळी काय करावे, यासंदर्भात माहितीपट व व्हिडीओ विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिस सायबर सेलला सोशल मीडियावर देशविरोधी आणि पाकिस्तानसमर्थक पोस्ट्सवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले असून, अशा प्रकरणांवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच सायबर हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वीज, पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या सेवांचे सायबर ऑडिट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये ८ दिवसांत ८ खेळाडूंना दुखापत)
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन खर्चासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्ताव एक तासात मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका तसेच हाउसिंग सोसायट्यांना ब्लॅकआउटसंदर्भात सहभागी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. (India Pakistan War)
सैनिकी हालचालींचे चित्रीकरण आणि त्याचे प्रसारण सोशल मीडियावर करणे हा गुन्हा मानण्यात येईल आणि अशा प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सागरी सुरक्षेसाठी गरजेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेण्याची सूचनाही देण्यात आली. (India Pakistan War)
विशेष म्हणजे, या संपूर्ण परिस्थितीत आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व सुरक्षा यंत्रणांनी गस्त वाढवून कोंबिंग ऑपरेशन्स अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांपर्यंत अचूक, वेळेवर आणि प्रामाणिक माहिती पोहोचवण्यासाठी स्वतंत्र माध्यम व्यवस्थाही उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराच्या तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि कोस्टगार्ड यांना पुढील बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करण्याची तयारीही करण्यात येत आहे. (India Pakistan War)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “राज्य सरकार (State Govt) पूर्णपणे सज्ज आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community