पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली. जवळपास १०० हून अधिक दहशतवादी हल्ल्यात ठार झाले. त्यात कुख्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख कमांडर अब्दुल रौफ असगरचा समावेश होता. (India Pakistan War)
(हेही वाचा – ‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ Indian Railway हायअलर्टवर; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना)
रौफच्या मृत्यूची बातमी मिळताच भारताच्या यशाचं सगळ्यांनी कौतुक केले. भारताच्या या कारवाईमुळे इस्त्रायल आणि अमेरिकाही खुश झाला आहे. अमेरिका-इस्त्रायली लोक Thank You India असे म्हणत भारताचे कौतुक करत आहेत.
जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) कमांडर अब्दुल रौफ असगर (abdul rauf azhar) हा अमेरिका आणि इस्त्रायल दोन्ही देशांचा कट्टर शत्रू होता. ही शत्रूता वाढण्याचे कारण होते पत्रकार डॅनियल पर्ल (Daniel Pearl). २००२ साली अमेरिकेतील ज्यू पत्रकार डेनियल पर्लचे पाकिस्तानात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. डॅनियलच्या हत्येतील मुख्य आरोपी रौफ होता. डॅनियल पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. जानेवारी २००२ साली कराचीत त्यांचे अपहरण झाले, जेव्हा ते पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील संबंध तपासण्यासाठी पाकले गेले होते. अपहरणानंतर एका महिन्याने डॅनियल पर्ल यांची क्रूर हत्या केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
डॅनियलच्या हत्येचा व्हिडिओ पाहून जग स्तब्ध झाले होते. पर्ल यांच्या हत्येचा मास्टरमाईंड उमर सईद शेख होता, ज्याने १९९९ साली इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. या अपहरणामागेही अब्दुल रौफ असगरचा हात होता. ज्याला कंदाहर विमान अपहरण म्हणूनही ओळखले जाते.
२००१ च्या (9/11 Terrorist Attacks) अमेरिकेवरील हल्ल्यानंतर डॅनियल पर्लला दक्षिण आशिया ब्यूरो प्रमुख म्हणून भारतातील मुंबई येथे तैनात केले होते. ते दहशतवाद आणि अल कायदा यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करत होते. एका विषयावर संशोधन करण्यासाठी ते पाकिस्तानच्या कराचीपर्यंत गेले; परंतु तिथे त्यांचे अपहरण झाले. त्यानंतर पर्ल यांचे हातात बेड्या घातलेले फोटो, डॉन पेपरचा फोटो समोर आले. पर्ल यांचे शीर कलम केल्याचे नंतर उघड झाले.
रौफ असगरच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झाल्यानंतर पत्रकार असरा नोमानी यांनी X वर पोस्ट केली. त्यात माझा मित्र डेनियल २००२ साली बहावलपूर येथे गेला होता. केवळ नोटबूक आणि पेनसह.. तिथे त्याने दहशतवादी ठिकाणांचा शोध घेतला. त्याला जोखीम घ्यायची नव्हती; परंतु त्याचा जीव धोक्यात येईल, याची त्याला कल्पना नव्हती, असे तिने म्हटले
अमेरिकन कार्यकर्ता एमी मेक यांनीही असगरच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला. भारताने पर्लच्या हत्येचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवादी गड उद्ध्वस्त केले. पाश्चिमात्य देशांनी इस्लामिक दहशतवादाशी कसे लढले पाहिजे, हे भारताकडून शिकायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.
दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेनेही भारताला त्यांच्यावरील कारवाईला उत्तर देण्याचा अधिकार आहे असं म्हटले. ब्रिटन, फ्रान्स, इस्त्रायल, नेदरलँडसह पनामानेही भारताला पाठिंबा दिला आहे. (India Pakistan War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community