
जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने (India Pakistan War) केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात ५ व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार हुतात्मा झाले. (India Pakistan War)
#GOC and all ranks of #WhiteKnightCorps salute the supreme sacrifice of L/Nk Dinesh Kumar of 5 Fd Regt, who laid down his life on 07 May 25 during Pakistan Army shelling.
We also stand in solidarity with all victims of the targeted attacks on innocent civilians in #Poonch Sector.…— White Knight Corps (@Whiteknight_IA) May 7, 2025
याबद्दल अधिक माहिती देताना व्हाईट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले की, “जीओसी आणि व्हाईट नाईट कॉर्प्सचे ऑल रँक ५ व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम, त्यांनी ७ मे २५ रोजी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात आपले प्राण गमावले.” (India Pakistan War)
हेही वाचा-India Pakistan War : पाकिस्तान घाबरला ! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीत रात्रभर Blackout
६ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात गोळीबार सुरू केला, जो ७ मे पर्यंत सुरू होता. या जोरदार गोळीबारामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक रहिवाशांना पळून जावे लागले आणि अनेक लोक जखमी झाले आहे. याचबरोबर १३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करी कारवाई झाल्यानंतर, पाकिस्तानने बुधवारीही युद्धबंदीचे उल्लंघन केले, नागरी भागात गोळीबार केला आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. (India Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community