India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव वाढलेला असून गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ले केल्यानंतर भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना, निवासी क्षेत्रांना नुकसान पोहोचविण्याच्या प्रयत्नात होता. त्याच योग्य प्रत्युत्तर भारतीय सैन्यदलाने दिले. पाकिस्तानच्या हल्ल्यांना परतवून लावण्यात भारताच्या मेक इन इंडिया क्षेपणास्त्र प्रणालीचा विशेष वाटा आहे.
(हेही वाचा India Pakistan War : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; चंदीगडमध्ये वाजले आपत्कालीन सायरन )
दरम्यान, रशियाकडून मिळालेल्या एस-४०० सह ‘मेक इन इंडिया’ क्षेपणास्त्र प्रणाली आकाश-ए७०(AKASH-L70)ने पाकिस्तानचा प्रत्येक ड्रोन पाडला. भारताच्या लष्करी तळांना आणि निवासी क्षेत्रांना नुकसान पोहोचविणाऱ्या पाकिस्तानी मनसुब्यांना भारताच्या आकाश-एल७० संरक्षण प्रणालीने हाणून पाडले. त्यामुळे रशियाकडून खरेदी केलेल्या एस-४०० प्रणालींनी अनेक हल्ले उधळून लावले असले तरी त्यापैकी बहुतेकांना भारतीय प्रणालीने जोरदार प्रत्युत्तर दिले.
AKASH-L70 मेक इन इंडिया सिस्टिम
AKASH-L70 मेक इन इंडिया सिस्टिम भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन(डीआरडीओ)ने विकसित केली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली असलेल्या AKASH-L70 ने पाकिस्तानविरुध्दच्या गुरूवारी रात्री झालेल्या लष्करी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. एका संरक्षण प्रणालीची किंमत सुमारे ₹२.५ कोटी असून त्याच्या एका युनिटमध्ये एक रडार आणि चार लाँचर आहेत.
पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर
गुरूवारी रात्री भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. कराचीवर १५ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. यावेळी केलेल्या हल्यात कराची पोर्ट उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्री उशिरा पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना पुन्हा भारताने लक्ष्य केले. विशेषतः पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळांवर भारताने जोरदार हल्ला करून उद्ध्वस्त केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या नागरी क्षेत्रात क्षेपणास्त्रे डागली. ती सगळी क्षेपणास्त्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निष्प्रभ ठरवली. त्यानंतर भारताने रात्री १०.२५ वाजता पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्ये क्षेपणास्त्रे डागली. विशेष म्हणजे भारताने आधीच तेथील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली.
Join Our WhatsApp Community