
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, गुप्तवार्ता व नागरी सुरक्षेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज घेलेल्या सुरक्षा आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. (India-Pakistan War)
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये ८ दिवसांत ८ खेळाडूंना दुखापत)
सध्याच्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनाने (State Government) सज्जतेचे धोरण अवलंबले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची सतत उपलब्धता आवश्यक असल्याने त्यांना सुट्टीवर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य सेवांची सातत्यपूर्ण उपलब्धता, आपत्कालीन उपाययोजना, हॉस्पिटलमधील समन्वय, ब्लॅकआऊट (Blackout) काळातील आराखडा आणि जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचे काम यामध्ये गती येण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. (India-Pakistan War)
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही सामान्य स्थिती नाही. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी अलर्ट राहावे. जनतेत घबराट न होता, योग्य दिशेने कार्यवाही व्हावी यासाठी अधिकारी वर्ग सतत सेवा सुरू ठेवेल.” सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे अधिकृत पत्रक पाठवण्यात आले असून, राज्यातील यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या पावलामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत असून, प्रशासनाला आवश्यक ती क्षमता व मार्गदर्शन देण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे.
दरम्यान, समाज माध्यमातून खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या जातात. खोट्या बातम्या सांगणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला आहे. सैन्य दल, तटरक्षक दलाकडून जी तयारी सुरु आहे त्याचे चित्रीकरण करून कुणीही समाज माध्यमात व्हिडीओ टाकून प्रसारित करू नये. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.(India-Pakistan War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community