India Pakistan War : जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; काश्मीरमध्ये पुन्हा शिरले पाकिस्तानी ड्रोन, स्फोटांचे आवाज

India Pakistan War : भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) तात्काळ हे ड्रोन (Drone Attack) हवेतच नष्ट केले.

66

भारताशी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला असला, तरी पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अजूनही सुरुच आहेत. सोमवार, १३ मेच्या रात्री काही पाकिस्तानी ड्रोन्स काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सांबा सेक्टरमध्ये घिरट्या घालताना दिसून आले. भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) तात्काळ हे ड्रोन (Drone Attack) हवेतच नष्ट केले. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआऊट करावा लागला. (India Pakistan War)

(हेही वाचा – India-Pakistan Tension : तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार)

सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स उद्ध्वस्त करताना आकाशात लाल रंगाच्या पट्ट्या आणि त्या पाठोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू आले. भारतीय सैन्याने कोणतेही पाकिस्तानी (Pakistan) ड्रोन्स शिरले नसल्याची माहिती दिली. तसेच शस्त्रसंधी कायम असल्याचे सांगितले. परंतु, सांबा सेक्टरमध्ये आकाशातील लाल पट्टे आणि स्फोटांच्या आवाजांमुळे याठिकाणी नक्की काय घडले, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. सुरुवातीला ड्रोन्स दिसल्यानंतर आणि ते नष्ट झाल्यानंतर पुढे काहीही घडले नाही.

भारत आणि पाकिस्तानी लष्कराच्या डीजीएमओ दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी चर्चा झाली होती. या वेळी पाकिस्तानने आम्ही शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नाही, असे आश्वासन दिले होते. पुढील काही तासांमध्येच म्हणजे रात्रीच्या सुमारास सांबा, जालंधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स घिरट्या घालताना आढळून आले. सोमवारी रात्री अमृतसर हवाई तळावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. अमृतसर आणि होशियारपूर या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.