India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले….

India Pakistan War : आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या कराराशी कटिबद्ध आहोत, असे चीनने म्हटले आहे.

190

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याशीही फोनवरून संपर्क साधला आहे. याबाबत माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांना ठार मारण्यात आल्यामुळे दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करणे गरजेचे होते, असे अजित डोवाल यांनी म्हटले. भारताला युद्ध नको आहे. युद्ध कोणाच्याच हिताचे नसते. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या कराराशी कटिबद्ध आहोत. आम्ही क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होईल, अशी आशा करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. (India Pakistan War)

(हेही वाचा – India Pakistan War : भारताच्या विजयासाठी नाशिक येथे ‘युद्ध विजय यज्ञ’ संपन्न)

यानंतर भारतीय सैन्यालाही (Indian Army) पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भारताचा शेजारी असलेला चीन (China) सातत्याने पाकिस्तानची (Pakistan) तळी उचलून धरताना दिसत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी राहू, असे चीनकडून सांगण्यात आले. असे असूनही आता भारतीय उच्चाधिकाऱ्यांना फोन करून मध्यस्थी केल्याची बतावणी चीन करत आहे.

या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Foreign Minister Wang Yi) यांनी म्हटले की, आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. आमचा कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला विरोध आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत असून या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे. आशियाई क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे खूप अवघड आहे. आपण ही गोष्ट जपली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी असून त्यांना वेगळे करता येणार नाही, असे वांग यी यांनी म्हटले.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता आणि संयम राखावा. चर्चा आणि विचारविनिमय करून मतभेदांवर तोडगा काढावा आणि परिस्थिती चिघळण्यापासून रोखावे. ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्या हिताची असून आंतरराष्ट्रीय समुदायालाही हीच गोष्ट हवी असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.