India-Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात भारतीय लष्काराच्या कारवाईचं स्वागत होत आहे. गुरूवारी रात्री भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला यात पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद सारख्या शहरांवर Air Strike केला. पण तुम्हाला एक प्रश्न जरुर पडला असेल तो म्हणजे Air Strike रात्रीच्या सुमारास का केले जातात?
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळं क्षेपणास्त्र हल्ल्याने उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळालं. गुरूवारी रात्री झालेल्या कारवाईत भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची रडार सिस्टम उध्द्वस्त करून टाकली. तरीसुध्दा पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच होत्या. त्यावेळेस सीमेवरील भारताच्या राज्यांत जम्मू-काश्मीर, राजस्थान व पंजाबमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. रात्रीच्या वेळेस झालेल्या कारवाईत भारताने पाकिस्तानला अक्षरशः मेटाकुटीला आणले.
रात्रीच्या वेळेस का केले जातात एअर स्ट्राईक?
याआधी झालेल्या भारतीय सैन्यदलांच्या विशेष मोहिमा रात्रीच्या वेळेस झाल्याचे समोर आले होते. बालाकोट एअर स्ट्राईक, उरी सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या विशेष मोहिमा भारतीय सैन्यदलाने रात्रीच्या वेळेस फत्ते केल्या. रात्रीच्या वेळेसच एअर स्ट्राईक करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शत्रूचा बेसावधपणा, रात्रीच्या वेळी शत्रू गाफील असण्याचा फायदा होतो. म्हणजे रात्रीच्या सुमारास प्रतिस्पर्धी शत्रू फारसा सतर्क नसतो. यामुळे अचूक लक्ष्यभेद करण्याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण होते. तसेच, कमी दृश्यमानतेमुळे शत्रूला हल्ला कुठून होतोय याबाबत अचूक अंदाज लवकर येत नाही. या कारणाने शत्रूवर एअर स्ट्राईक हे रात्रीच्या वेळेस पाडले जातात.Air Strike
Join Our WhatsApp Community