India-Pakistan Tension : पंतप्रधान Narendra Modi काय बोलणार?, रात्री ०८ वाजता देशवासियांना संबोधन

India-Pakistan Tension :  भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ०८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार, याकडे सबंध देशाचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा करण्यात येत आहे.

56

India-Pakistan Tension :  भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi रात्री ०८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार, याकडे सबंध देशाचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा करण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळेत बदल होऊन डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची पाकिस्तानच्या डीजीएमओसोबत चर्चा पुढे ढकलण्यात म्हणजेच सायंकाळी होईल अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे डीजीएमओंच्या बैठकीत नेमकं काय चर्चा होणार यांसदर्भातही लवकरच माहिती समोर येईल.

(हेही वाचा Viral Video : भारताची ताकद पाहून पाकिस्तान भरली धडकी; पाकिस्तानी नागरिकांची विक्षिप्त प्रतिक्रिया )

पाकिस्तानचे डीजीएमओसोबत चर्चा सुरू असून रात्री ०८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे सबंध देशाचं लक्ष लागले आहे. याआधीच भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात कारवाई केली. एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळं उडवून देण्यात आली आहेत.

याआधीही विविध घोषणांकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री ०८ वाजता देशाला संबोधित केले होते. त्यानंतर आज भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी नोटाबंदी, लॉकडाऊन आणि अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर देशावासियांना संबोधन केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.