India-Pakistan Tension : पाकिस्तानी लष्कराच्या चोराच्या उलट्या बोंबा; म्हणाले, भारताने आमच्यावर प्रथम केला हल्ला…

India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणावानंतर पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेलं वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल.

38

India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणावानंतर पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेलं वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, भारताने प्रथम आमच्यावर हल्ला केला असून आम्ही स्वसंरक्षणार्थ त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. तसेच, पाकिस्तानला आपले हक्क माहीत आहेत असे सांगत कांगावा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(हेही वाचा शस्त्रसंधीचे उल्लंघन आधी भारताने केले; पाकिस्तानचे पंतप्रधान Shahbaz Sharif यांचा धादांत खोटारडेपणा )

तणावाच्या पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानकडून भारताविरोधात आगळीक करण्यात येत आहे. मागील चार दिवसांत झालेल्या भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झाले असून पाकिस्तानी लष्कराकडून यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. बिथरलेल्या पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते चौधरी म्हणाले की, भारतीय सैन्य स्वप्न पाहत आहे, की ते पाकिस्तानी सैन्याला पराभूत करू शकतात. भारताला योग्य उत्तर दिले जाईल.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून खोटा दावा केला. शाहबाज शरीफ म्हणाले, भारताने हल्ला करून जी चूक केली, त्याचे परिणाम त्यांना निश्चितच भोगावे लागतील, अशा वल्गना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. उलटपक्षी भारताच्या लष्करी कारवाई घाबरून पाकिस्तानी डीजीएमओंनी फोन करून युध्द थांबविण्याची विनंती केली होती. अखेर घाबरलेल्या शाहबाज शरीफ यांनी युध्द थांबवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.India-Pakistan Tension

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.