पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कुठल्याही क्षणी प्रत्त्युत्तर देईल, या भितीने पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून LOC वर सातत्याने शस्त्रसंधीच उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि पंजाब पोलिसांनी मिळून हे ऑपरेशन केल आहे. (India-Pakistan Border)
हेही वाचा-LOC वर पाकिस्तानचा गोळीबार; भारताचेही सडेतोड प्रत्युत्तर
अमृतसरमधील भारोपाल गावातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे. बीएसएफच्या इंटलेजिन्स विंगने दिलेल्या टिपच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. 30 एप्रिलच्या संध्याकाळी संयुक्त शोध मोहिम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये दोन हँड ग्रेनेड, तीन पिस्तुल, सहा मॅगझीन आणि 50 गोळ्या जप्त करण्यात आल्या. (India-Pakistan Border)
पुढील चौकशीसाठी हा सर्व शस्त्रसाठा पोलिसांकडे देण्यात आला आहे. समन्वय साधून करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची सर्तकता आणि तयारी दिसून आली. अत्यंत चपळाईने समन्वय साधून ही कारवाई केली. पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. कधी, कुठून कसा हल्ला होईल ही भिती पाकिस्तानला सतावत आहे. पाकिस्तानकडून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे. (India-Pakistan Border)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community