India Pak War : भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही; अमेरिकेचा हस्तक्षेप करण्यास नकार

66

आम्हाला माहिती आहे, अमेरिका भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आपण पाकिस्तानलाही शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. म्हणून, आम्ही राजनैतिक माध्यमांद्वारे या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आशा अशी आहे की, या व्यापक प्रादेशिक युद्धाचे आण्विक संघर्षात (Nuclear Conflict) रूपांतर होणार नाही. आम्हाला या गोष्टींबद्दल काळजी आहे. जर असे घडले तर ते विनाशकारी होईल परंतु सध्या आम्हाला वाटत नाही की असे काही घडेल, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) यांनी म्हटले आहे. (India Pak War)

(हेही वाचा – India Pak War : भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही; अमेरिकेचा हस्तक्षेप करण्यास नकार)

भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या तळावर ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून हवाई हल्ले केले होते. यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर गुरुवारी रात्री जम्मूच्या सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहरांवर पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निकामी केले. पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढला आहे. या परिस्थितीवर अमेरिकेने भूमिका स्पष्ट केली असून, ते भारताला शस्त्रे खाली ठेवायला सांगू शकत नाहीत आणि त्यांना यामध्ये अडकायचे नाही, अशी भूमिका अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मांडली आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) म्हणाले की, “आपण लोकांना केवळ तणाव कमी करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आपण अशा युद्धात अडकणार नाही जे मुळात आपले काम नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेचा काहीही संबंध नाही.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, “माझी भूमिका स्पष्ट आहे, मी दोन्ही देशांसोबत काम करतो आणि त्यांनीच हे सोडवावे अशी माझी इच्छा आहे. ते एकमेकांच्या विरोधात आहेत, पण मला आशा आहे की, ते आता हे थांबवू शकतील. जर काही मदत लागली, तर मी त्यासाठी उपलब्ध असेन.” (India Pak War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.