India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले

चीनी बनावटीचे आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले. काल दोन विमाने पाडली होती. पाकची विमाने पडल्याची कबुली पाकच्या संरक्षण अधिकाऱ्याने अधिकृतपणे दिली.

80
India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले
India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले

India Pak War : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला (Jammu drone attack) केला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या हल्ल्याला प्रतीउत्तर देत असताना चीनी बनावटीचे आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले. काल दोन विमाने पाडली होती. पाकची विमाने पडल्याची कबुली पाकच्या संरक्षण अधिकाऱ्याने अधिकृतपणे दिली. राजस्थानमध्ये हे विमान पाडले. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. (India Pak War)

(हेही वाचा – प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास)

गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं आहे.

भारताने अनेक ड्रोन पाडले

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची एस 400 ही डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली असून त्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूमध्ये नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती समोर आली नाही. पण भारताकडून ते सर्व ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू आहे.

राजस्थानमध्येही ब्लॅकआऊट

जम्मूनंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागातही ब्कॅकआऊट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सक्रिय झालं आहे. तिथे पाकिस्तानचे एक दोन लढाऊ विमान पाडले. आतापर्यंत तीन लढावू विमाने पाडली आहेत.

(हेही वाचा – प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास)

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या एस-४०० प्रणालीने हे सर्व हल्ले परतवून लावले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.