भारताने (India) ऑपरेशन सिंदूर नंतरही पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूच राहिल्या. त्यामुळे भारताने लाहोर आणि रावळपिंडी येथील हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त केली. मात्र तरीही पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या नागरी क्षेत्रात क्षेपणास्त्रे डागली, ती सगळी भारताच्या सुदर्शन अर्थात S – 400 या हवाई संरक्षण यंत्रणेने निष्प्रभ ठरवली. आता भारताने (India) रात्री १०.२५ वाजता पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्ये क्षेपणास्त्रे डागली. विशेष म्हणजे भारताने (India) आधीच तेथील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्यामुळे भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांचा पाकिस्तानवर बराच परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळी याचे परिमाण दिसून येणार आहे.
वायू दल आणि नौ दलही झाले सज्ज
भारताने (India) आता तातडीने वायू दल आणि नौ दल यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून भारत तिन्ही दलांच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याने कदाचित या दिवसापासून पूर्ण स्वरूपात युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा Indian Defense : भारतीय शस्त्रास्त्रे अचूक भेदक, मारक; मोदी सरकारची १० वर्षांची आहे ‘ही’ तपस्या)
अमेरिकेची मध्यस्थीची तयारी
आता अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झालेल्या युद्धात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत यासाठी अमेरिका आता प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. मात्र भारताने (India) जी आक्रमक भूमिका घेतली आहे, हे पाहता भारत याला किती मान्य होतो, यावर साशंकता आहे.
Join Our WhatsApp Community