S-400 : पाकड्यांच्या अणुबॉम्बवर भारताच्या ‘सुदर्शन’चा घाव

पाच मिनिटांत तैनात करता येणारी, S-400 अर्थात 'सुदर्शन' ही एक अत्यंत गतिमान क्षेपणास्त्र प्रणाली (Air Defense System) आहे जी जॅमिंगला देखील प्रतिरोधक आहे.

138

बुधवारी, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकपुरस्कृत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) प्रतिहल्ला करताना थेट सीमावर्ती भागात नागरी वस्त्यांवर हल्ले केले, क्षेपणास्त्रे टाकली. ती सर्व भारताच्या S-400 अर्थात सुदर्शन या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली. याशिवाय F-16 विमानेही पाडली. भारताच्या या हवाई संरक्षण यंत्रणेचा परिणाम इतका आहे की, भारताच्या दिशेने येणारे कोणतेही शस्त्र विमान, ड्रोनही पाडता येते. पाकिस्तान सुरुवातीपासून अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत आहे, मात्र आता अणुबॉम्बची धमकी पोकळ ठरणार आहे. अणुबॉम्बही निष्प्रभ करण्याची क्षमता या प्रणालीकडे आहे.

एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे काय?

S-400 अर्थात ‘सुदर्शन’ ही रशियाच्या एनपीओ अल्माझने विकसित केलेली एक मोबाईल सरफेस-टू-एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही पूर्वीच्या एस-३०० क्षेपणास्त्र प्रणालीचे अपग्रेड आहे. २००७ मध्ये रशियाने एस-४०० यंत्रणेला सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट केले होते. रशिया सध्या एस-५०० विकसित करत आहे.

(हेही वाचा India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले)

पाच मिनिटांत तैनात करता येते 

पाच मिनिटांत तैनात करता येणारी, S-400 अर्थात ‘सुदर्शन’ ही एक अत्यंत गतिमान क्षेपणास्त्र प्रणाली (Air Defense System) आहे जी जॅमिंगला देखील प्रतिरोधक आहे.  S-400 प्रणाली ४०० किलोमीटरपर्यंत आणि ३० किमी उंचीवरील विमान, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यांसारख्या हवाई हल्ल्यांना हवेतच नष्ट करू शकते. ही यंत्रणा एकाच वेळी ३०० लक्ष्यांचा मारा रोखू शकते आणि ३६ लक्ष्यांना नष्ट करू शकते. एस-४०० मध्ये चार प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत: ४०एन ६ ई (४०० किमी रेंज), ४८ एन ६ ई ३ (२५० किमी), ९ एम ९६ ई २ (१२० किमी) आणि ९ एम ९६ ई (४० किमी). S-400 मध्ये 360-अंश देखरेख आणि काउंटर-स्टील्थ क्षमतांसाठी 96L6E सारखे प्रगत रडार आहेत.

दरम्यान भारत एक स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (Air Defense System), प्रकल्प कुशा विकसित करत आहे. लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे किंवा LR-SAM समाविष्ट करण्याची क्षमता आहे. कुशा प्रकल्पाचे नेतृत्व भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना किंवा DRDO करत आहे. कुश १५० किमी ते ३५० किमी पर्यंतच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांसह एक स्तरित संरक्षण प्रणाली (Air Defense System)  प्रदान करेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.