India Defence Export : रिलायन्स इन्फ्राची २ वर्षांत ३,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीची तयारी

India Defence Export : भारताची खाजगी संरक्षण निर्यातही आता वाढत आहे. 

60
India Defence Export : रिलायन्स इन्फ्राची २ वर्षांत ३,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीची तयारी
  • ऋजुता लुकतुके

मुकेश अंबानींचे भाऊ अनिल अंबानींची रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी येत्या दोन वर्षांत ३,००० कोटी रुपयांची संरक्षण सामुग्री देशाबाहेर निर्यात करण्याच्या तयारीत आहे. यात खासकरून बंदुकी आणि रायफलच्या गोळ्यांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षातच कंपनीची निर्यात १,५०० कोटींच्या घरात असेल, असा अंदाज आहे. एकेकाळी कर्जात बुडलेल्या या कंपनीने आता कात टाकायला सुरुवात केली असून आतापर्यंत या क्षेत्रातील उलाढाल १०० कोटी रुपयांवर नेली आहे. (India Defence Export)

(हेही वाचा – Ukraine Attack : युक्रेनचा मास्टरस्ट्रोक रशियावर पडला भारी ! ‘असा’ आखला हल्ल्याचा कट)

रिलायन्स इन्फ्रासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ युरोपीयन महासंघातील देशांची आहे. इथे तोफा तसंच रायफलींचा दारुगोळा पुरवण्याचं काम ही कंपनी करते. तसंच संरक्षण एग्रिगेट्सही निर्यात करते. कंपनीने महाराष्ट्रातील रत्नागिरी इथं धीरुभाई अंबानी संरक्षण नगर वसवण्याचं काम हाती घेतलं आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामुग्री उत्पादनात गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार आहे. (India Defence Export)

(हेही वाचा – India A vs England Lions : टॉम हेन्स, मॅक्स होल्डन यांच्या शतकामुळे इंग्लंड लायन्सचं भारताला दमदार उत्तर)

रत्नागिरीतील वातड गावाजवळ १००० एकर जागा त्यासाठी अनिल अंबानी यांना देण्यात आली आहे. दारुगोळा आणि गोळ्यांसह स्फोटकं बनवण्याचा कारखाना इथं उभा राहणार आहे. खाजगी क्षेत्रात संरक्षणविषय सामुग्रीसाठी झालेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. इथं उत्पादनासाठी रिलायन्स इन्फ्राने जर्मनीतील एका कंपनीशी संयुक्त भागिदारीतील करार केला आहे. रत्नागिरी इथं उभ्या राहणाऱ्या प्रकल्पात २ लाख टन आर्टिलरी शेल्स, १०,००० टन स्फोटकं, २,००० टन प्रोपेलर निर्मिती होणार आहे. सध्या रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी देशातील पहिल्या तीन संरक्षण सामुग्री निर्यात करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. (India Defence Export)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.