Ind-Pak War : देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल तर कुठे ब्लॅकआऊट…; नागरिकांना दिली बचावाची माहिती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानInd-Pak War दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

79

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानInd-Pak War दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजनाचे आदेश दिले होते. त्यानंतर आता देशभरात पोलीस यंत्रणेकडून ठिकठिकाणी मॉक ड्रिलेच आयोजन करण्यात येत आहे. शाळा, सार्वजनिक ठिकाणे विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मॉक ड्रिल्स घेण्यात आल्या.

इंदौरमध्ये स्कूल बस आणि गॅस टँकरमधील टक्करवर एक मॉक ड्रिल घेण्यात आले. या माध्यमातून स्थानिकांना जागरुकतेबाबत सतर्क करण्यात आले. त्याचबरोबर, वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात देखील मॉक ड्रिल घेण्यात आले. येथे सायरन वाजताच मंदिर रिकामे करण्यात आले. या सरावात बॉम्ब पथक, वैद्यकीय पथक, श्वान पथक आणि एनडीआरएफ पथक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे, विशाखापट्टणममध्ये राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)कडून एक मॉक ड्रिल घेण्यात आली. यामध्ये युद्धादरम्यान संरक्षणाची तयारी करण्यात आली असून आग, नुकसान इत्यादी परिस्थितीत लोकांना रिअल टाइममध्ये कसे बाहेर काढायचे हे कॅडेट्सना शिकवण्यात आले.

(हेही वाचा पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाच्या पत्नीची Operation Sindoor वर प्रतिक्रिया; आमच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा… )

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २४४ ठिकाणी युद्धादरम्यानच्या नागरी संरक्षणाबाबतचे मॉक ड्रिल घेण्यात आले. संध्याकाळी ब्लॅकआऊटचा देखील सराव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, नागरी संरक्षण जिल्हे त्यांच्या संवेदनशीलतेनुसार 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. श्रेणी-१ सर्वात संवेदनशील, श्रेणी-३ कमी संवेदनशील आहे. महाराष्ट्रातील मुंबई, तारापूर, उरण या ठिकाणांचा सर्वात संवेदनशील श्रेणीत समावेश केला आहे.

दि. ०५ मे रोजी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार संबंधित राज्यांत मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले असून भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षणाबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. युध्दजन्य परिस्थितीत नागरी संरक्षणातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या ब्लॅकआउट म्हणजे मानसिक तयारी. युद्धाच्या वेळी ब्लॅकआउटमुळे एखादा परिसर सुरक्षित राहू शकतो ही कल्पना नागरिकांना शांत राहण्यास मदत करते. ब्लॅकआउटमुळे लोकांना शिस्तबद्ध राहण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास प्रोत्साहित केले जाते.Ind-Pak War

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.