भारत-पाकिस्तान तणावानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अॅक्शन मोडवर आले असून बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरां(Illegal Infiltrators)विरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. अवैध घुसखोरांची ओळख पटविण्याकरिता आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, सर्व राज्यांनी घुसखोरांची(Illegal Infiltrators) ओळख पटविण्यासाठी त्यांच्या वैधानिक अधिकारांचा वापर करत पडताळणीनंतर हद्दपारीची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रत्येक राज्याला जिल्हा पातळीवर पुरेशी डिटेन्शन सेंटर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या डिटेन्शन सेंटर्समध्ये संशयित स्थलांतरितांना हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात येणार असून भविष्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक करू नये म्हणून बायोमेट्रिक माहिती देखील त्यांच्याकडून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे सीमा सुरक्षा दल(बीएसएफ) आणि आसाम रायफल्स यांसारख्या सुरक्षा दलांनाही लक्ष ठेवण्यासाठी या प्रकियेत सहभागी केले जाणार आहे.
(हेही वाचा VIDEO : Operation Sindoor चा नवा व्हिडीओ लष्कराने केला जारी ; पहा शत्रूंचे अड्डे कसे उद्ध्वस्त केले … )
अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरां(Illegal Infiltrators)वर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कडक कारवाई करण्यात येणार असून ३० दिवसांच्या आता ओळख पटवून संशियतांचे कागदपत्रे तपासत देशाबाहेर हाकलून द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. घुसखोर असल्याचा संशय असलेल्यांची कागदपत्रे ३० दिवसांच्या आत पडताळून पहावीत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर, जर एखादी व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचा दावा करत असेल तर त्याची ओळख आणि पार्श्वभूमी माहिती गोळा करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असेल.(Illegal Infiltrators)
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया(ओसीआय) पोर्टलचे उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे नवीन ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) पोर्टलचे उद्घाटन केले. गेल्या दशकातील महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगती आणि ओसीआय कार्डधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या पार्श्वभूमीवर कमतरता दूर करण्यासाठी आणि वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी एक नवीन ओसीआय पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community