इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं काही नाव घेत नसताना आता हमासने युध्दबंदीची मागणी केली. इस्त्रायल संरक्षण दलाच्या लष्करी कारवाईसमोर हमास संघटनेने अखेर गुडघे टेकल्याचे समोर आले आहे. गाझा पट्टीवर इस्त्रायलने हल्ला केल्यानंतर हमासचा गाझा प्रमुख नेता मोहम्मद सिनवार ठार झाला होता. यासंदर्भात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी संसदेत घोषणा केली होती. (IDF)
पॅलस्टिनी दहशतवादी संघटना हमासने अमेरिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देताना मोठे विधान केले असून १० ओलिसांना आणि १८ मृतदेहांना सोपविण्यास तयार आहोत. या बदल्यात हमासने इस्त्रायलसमोर दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. यात गाझा पट्टीतून इस्त्रायली सैन्याची संपूर्ण माघार आणि दुसरं म्हणजे कायमस्वरूपी युध्दविराम. असे अमेरिकेच्या प्रस्तावाला उत्तर देताना हमासने म्हटले आहे.(IDF)
महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेचा प्रस्ताव इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री आणि सरकारचे प्रतिनिधी रॉन डर्मर यांच्या सहमतीने तयार करण्यात आला होता. या प्रस्तावात ६० दिवसांच्या युद्धबंदीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर इस्रायलला पुन्हा युद्ध सुरू करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय, या काळात गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील मानवतावादी मदत कार्यान्वित करण्याची योजना देखील समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर, इस्रायलने आधीच हा प्रस्ताव स्वीकारला होता.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केली होती संसदेत घोषणा
इस्त्रायली संसदेत बोलताना पंतप्रधान नेत्यानाहू म्हणाले होते की, इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या हमास नेत्यांच्या यादीत सिनवार यांचा समावेश करण्यात आला. मोहम्मद सिनवार हा हमास नेता हा दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवार याचा भाऊ आहे, असे सांगतानाच गेल्या वर्षी इस्रायली सैन्याने मारला त्याचा खात्मा केला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
दरम्यान, तब्बल दोन वर्षांपूर्वी हमासने सीमापार केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. तसेच, मागील दोन वर्षांत गाझामध्ये किमान ५४,०८४ लोक मारले गेले, असे स्थानिक आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.
Join Our WhatsApp Community