जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी (Hybrid Terrorists) आज, गुरूवारी आत्मसमर्पण केले. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी त्यांची नावे आहेत या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दोघेही लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंधित होते आणि ते हायब्रिड दहशतवादी म्हणून काम करायचे. सामान्य लोकांसारखे जगणारे, परंतु गुप्तपणे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यांना हायब्रिड दहशतवादी म्हटले जाते. (Hybrid Terrorists)
Shopian, Jammu and Kashmir | Two LeT hybrid terrorists identified as Irfan Bashir and Uzair Salam surrendered following an operation launched by security forces in Baskuchan area yesterday. Two AK-56 rifles, 4 magazines, 102 rounds (7.62x39mm), 2 hand grenades, 2 pouches etc were… pic.twitter.com/IkJVl4fPXs
— ANI (@ANI) May 29, 2025
हे हायब्रिड दहशतवादी, दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नसतात परंतु दहशतवादी हल्ला करण्यासाठी ते पुरेसे कट्टरपंथी असतात. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली तेव्हा परिस्थिती पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शोधमोहिमेदरम्यान त्यांच्याकडून दोन एके-५६ रायफल, चार मॅगझिन, १०२ जिवंत काडतुसे (७.६२×३९ मिमी), दोन हातबॉम्ब आणि दोन पाउच जप्त करण्यात आले. (Hybrid Terrorists)
“या परिसरातील एका बागेत दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्यानंतर परिसराला प्रभावीपणे वेढा घालण्यात आला होता. सैन्याच्या जलद आणि धोरणात्मक कारवाईमुळे लष्कर-ए-तैयबाच्या दोन हायब्रिड आत्मसमर्पण केले, ज्यामुळे संभाव्य चकमक टळली,” असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. (Hybrid Terrorists)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community