Hamas Leader Killed : हमासचा गाझा प्रमुख(Hamas Leader Killed) मोहम्मद सिनवार ठार झाल्याची घोषणा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली. ते म्हणाले, इस्त्रायल सैन्याने हमासचा बडा नेता मोहम्मद सिनवार याला ठार मारले. गाझा पट्टीवर अलीकडेच झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा खुलासा पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केली.(Hamas Leader Killed)
दरम्यान, इस्त्रायली संसदेत बोलताना पंतप्रधान नेत्यानाहू म्हणाले, इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या हमास नेत्यांच्या यादीत सिनवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिनवार हा हमास नेता हा दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवार याचा भाऊ आहे, असे सांगतानाच गेल्या वर्षी इस्रायली सैन्याने मारला त्याचा खात्मा केला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा Operation Sindoor : भारताने पाकिस्तानी हवाई दलाला ५ वर्षे मागे लोटले, कसे ते जाणून घ्या )
दरम्यान, तब्बल दोन वर्षांपूर्वी हमासने सीमापार केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. तसेच, गाझा प्रदेशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांत गाझामध्ये किमान ५४,०८४ लोक मारले गेले आहेत.
दि. १३ मे रोजी दक्षिणेकडील खान युनिस शहरातील युरोपियन रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात इस्रायलने केलेल्या मोठ्या हल्ल्यात मोहम्मद सिनवार याला इस्त्रायली सैन्याकडून लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात हमासची भूमिगत पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले होते. विशेष म्हणजे हमासने अद्याप सिनवारच्या खात्माबाबत कुठलाही दुजोरा दिलेला नाही. (Hamas Leader Killed)
Join Our WhatsApp Community