Gautam Adani: आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रनिर्मिती कारखान्याचे उद्घाटन

या संरक्षण संकुलाची घोषणा अदानी समुहाने २०२२ मध्ये उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिटदरम्यान केली होती. २ वर्षांत या संकुलाचे काम सुरू झाले आहे.

206
Gautam Adani: आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्याचे उद्घाटन
Gautam Adani: आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्याचे उद्घाटन

अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसतर्फे कानपूरमध्ये (Gautam Adani) दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

या संरक्षण संकुलाची घोषणा अदानी समुहाने (Gautam Adani) २०२२ मध्ये उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिटदरम्यान केली होती. २ वर्षांत या संकुलाचे काम सुरू झाले आहे.

(हेही पहा –Shiv Sena : समाजवादी पक्षात फूट, गोवंडीतील माजी नगरसेवक शिवसेनेत )

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘ही सुविधा पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारत मोहिमेच्या यशाचा पुरावा आहे आणि उत्तर प्रदेश औद्योगिक शक्तीस्थान बनले आहे.’ तसेच यावेळी APSEZ चे MDकरण अदानी म्हणाले की, या प्रकल्पाचा प्रभाव केवळ संरक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो खूप पुढे होणार आहे. याची सुरुवात १५०० कोटी रुपयांच्या गुंवतवणुकीने होत आहे. जी पुढील ५ वर्षांत ३००० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान 

कंपनीने (Gautam Adani) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५०० एकरमध्ये पसरलेले हे कॉम्प्लेक्स दक्षिण आशियातील सर्वात मोठे असेल. या प्रकल्पामुळे ४ हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा परिणाम एमएसएमई आणि स्थानिक परिसंस्थेवरही दिसून येईल. या कॉम्प्लेक्समध्ये सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या कॉम्प्लेक्समध्ये सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाचे लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचा दारूगोळा तयार केला जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.