Gaganyan : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असलेला “गगनयान” कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली गगनयान मोहीम कमी खर्चात अधिक परतावा देऊन भारताची अंतराळ कार्यक्षमता दर्शवित आहे, असे अंतराळ राज्यमंत्री डॉ. सिंह यांनी सांगितले. दरम्यान, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम “Gaganyan” कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २०२७ च्या पहिल्या तिमाहीत पहिले मानवी अंतराळ उड्डाण नियोजित आहे.
(हेही वाचा Indian Economy : २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी )
राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, टीव्ही-डी१ मोहिमेची यशस्वी पूर्तता आणि या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेले पहिले मानवरहित चाचणी वाहन अबॉर्ट मिशन यामुळे आगामी चाचणी वेळापत्रकासाठी एक मजबूत पाया रचला गेला आहे. दुसरे चाचणी वाहन मिशन (TV-D2) 2025 च्या अखेरीस होणार आहे, त्यानंतर (Gaganyan)ची मानवरहित कक्षीय उड्डाणे होणार आहेत. हे टप्पे पार पडल्यानंतर २०२७ मध्ये भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणाला प्रारंभ होईल. ज्यामध्ये भारतीय अंतराळवीरांना भारतीय भूमीवरून भारतीय यानातून कक्षेत सोडण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री सिंह यांनी दिली.
पहिले मानवरहित चाचणी वाहन अबॉर्ट मिशन यामुळे आगामी चाचणी वेळापत्रकासाठी एक मजबूत पाया रचला गेला आहे. दुसरे चाचणी वाहन मिशन (TV-D2) 2025 च्या अखेरीस होणार असून त्यानंतर गगनयानची मानवरहित कक्षीय उड्डाणे होणार आहेत. हे टप्पे पार पडल्यानंतर २०२७ मध्ये भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणाला प्रारंभ होईल. Gaganyan मोहिमेंतर्गत भारतीय अंतराळवीरांना भारतीय भूमीवरून भारतीय यानातून कक्षेत सोडण्यात येणार आहे.(Gaganyan)
Join Our WhatsApp Community