महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस स्टेशन हद्दीत चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान (Gadchiroli Naxalites Encounter ) घालण्यात गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या जवानांना यश आले. दोनच दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या अबूझमाडमध्ये सुरक्षा दलांनी २७ नक्षल्यांचा खात्मा केला होता. त्यात दीड कोटी रुपयांचे बक्षीस शिरावर असणारा कमांडर बसव राजू उर्फ गगण्णा मारला गेला होता. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. (Gadchiroli Naxalites Encounter )
नक्षल्यांची नावे
भरपावसात दोन तास चाललेल्या चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले असता, घटनास्थळावर २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. भामरागड दलम कमांडर सन्नु मासा पुंगाटी (वय ३५), दलम सदस्य अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे (वय ३८), विज्यो ऊर्फ विज्यो होयामी (वय २५), करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे (वय २१) अशी ठार झालेल्या नक्षल्यांची नावे आहे. (Gadchiroli Naxalites Encounter )
भामरागड परिसरात नक्षली एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाच्या १२ तुकड्या व सीआरपीएफ ११३ बटालियनची डी कंपनीची १ तुकडी २२ रोजी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात रवाना करण्यात आली होती. (Gadchiroli Naxalites Encounter )
शस्त्रसाठा जप्त
अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानात २३ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलिस पथकातील जवानांनी जंगल परिसरात घेराबंदी केली होती. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. घटनास्थळावरुन एक एस.एल.आर.रायफल, दोन ३०३ रायफल व एक भरमार असे एकूण ४ अग्निशस्त्र, वॉकीटॉकी, नक्षली साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. मृत नक्षल्यांवर चकमक, जाळपोळ व खून इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. (Gadchiroli Naxalites Encounter )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community