Gadchiroli मध्ये ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक !

Gadchiroli मध्ये ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक !

49
Gadchiroli मध्ये ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक !
Gadchiroli मध्ये ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक !

भामरागड तालुक्यातील अबूझमाडच्या बिनागुंडा परिसरातून पाच जहाल नक्षलवाद्यांना (Gadchiroli) अटक करण्यात आली आहे. अनेक हिंसक कारवायांमध्ये यांचा सहभाग होता. यांच्यावर तब्बल 36 लाख रुपयाचे बक्षीस होते. त्यांच्याकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफल, दोन भरमार बंदूक आणि चार रायफल असे सात हत्यार जप्त करण्यात आले आहे. उंगी होयाम ऊर्फ सुमली, पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी, देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून इतर दोघांची नावे समोर आलेली नाही. (Gadchiroli)

नेमकं काय घडलं ?
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी- 60 कमांडो आणि सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान अभियानावर असताना गोपनीय माहितीच्या आधारे गावाला घेराबंदी करण्यात आली. तेव्हा काही नक्षल गणवेशात आणि काही साध्या वेषात संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात घडवण्याची योजना आखत असल्याचे समोर आले. यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर पाच जणांना ताब्यात घेतले. (Gadchiroli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gadchiroli (@gadchirolipolice)

उंगी होयामवर 16 लाख, पल्लवी मिडीयमवर 08 लाख रूपयांचे तर देवे पोडीयाम 04 लाख रूपयांचे बक्षीस होते. तर इतर दोघांवर 8 लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती समोर आली आहे. विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी ‘देवसू’सह अन्य तीन माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसर्पण केलं आहे. 2017 पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूवर 3.50 लाख रुपयांचे बक्षीस होतं. तर गोंदिया जिल्ह्यात 2024 पासून सक्रिय असलेल्या अन्य 3 माओवाद्यांनी ही आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (Gadchiroli)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.