‘निधीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही’; पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला ‘FATF’ने सुनावले

FATF : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स(FATF)ने महत्त्वाचे भाष्य केले आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स(FATF)ने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली असून निधीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही असे म्हणत पाकिस्तानला फटाकरले आहे.

58

FATF : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स(FATF)ने महत्त्वाचे भाष्य केले आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स(FATF)ने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली असून निधीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही असे म्हणत पाकिस्तानला फटाकरले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर विशेषतः एफएटीएफ(FATF)च्या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये जाणार का?, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.(FATF)

दरम्यान, २२ एप्रिल २०२५ यादिवशी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ महिन्यांनंतर FATF कडून प्रतिक्रिया आली असून आता त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला एफएटीएफ(FATF)च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणीही भारताने केली होती. त्यानंतर आता एफएटीएफने ही मागणी मान्य केली नाही असा पाकिस्तानचा दावा असला तरीही अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा PM Narendra Modi : कॅनडातील अल्बर्टामध्ये जी-७ शिखर परिषदेची बैठक; पंतप्रधानांच्या दौऱ्यावर खलिस्तान्यांचं संकट? )

FATF ने यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले की, दहशतवादी हल्ल्यात जगभरात निष्पाप मारले जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. तसेच, (FATF) पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र दहशतवाद्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यापासून थांबवण्यासाठी प्रत्येक वेळी यशस्वी होणे आवश्यक असल्याचे (FATF) ने म्हटले.

(FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशांना परदेशी व्यापार करणे व कर्ज उभारणे कठीण जाते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध देखील लादले जातात. खरंतर, मनी लाँड्रिंगवर लक्ष ठेवण्यासाठी (FATF) ची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर दहशतवादी निधी पुरवणाऱ्या देशांवर कारवाई करण्याची जबाबदारीही एफएटीएफकडून पार पाडण्यात येते.(FATF)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.