पहलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी आक्रमक करून २६ निरपराध नागरिकांना ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत जो हल्ला पाकिस्तानवर (Pakistan) केला, त्यावेळी पाकिस्तानने हॉटलाईनवरून फोन करून शस्त्रसंधी करण्याची गयावया भारताकडे केली. पाकिस्तनाने शेपूट पायात घालण्याची ही पहिली वेळ नाही. पाकड्यांच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करून ४६ जवानांना ठार केले होते. त्यावेळी त्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश – ए – महंमद च्या तळावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने हॉटलाईनवरून फोन करून शस्त्रसंधीसाठी हातापाया पडला होता. याविषयीची माहिती लेफ्ट. जनरल (नि.) विनोद खंदारे यांनी एनडीटीव्ही मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली.
…आणि पाकिस्तानचा डीजीएमओ म्हणाला थांबा
कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा युद्ध असो दोन देशांमध्ये हॉटलाइनवरून संपर्क साधला जातो. भारताने जेव्हा दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हाही त्यांना हॉटलाइनवरून हे कळवण्यात आले होते. उरी, बालाकोट कारवाईच्या वेळीही पाकिस्तानला (Pakistan) संदेश पोहचवण्यात आला होता. भारताने हे अड्डे रात्रीचा वेळी उद्ध्वस्त केले, कारण त्यावेळी सामान्य नागरीक झोपलेले असतात आणि भारताचा मुख्य उद्देश दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे हा होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. याबद्दल पाकिस्तानकडून (Pakistan) हॉटलाइनवरून काहीही कळवण्यात आले नव्हते. त्यानंतर भारताने पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आणि पाकिस्तानने हॉटलाइनवरून भारताची रात्री 3.35 वाजता संपर्क साधला. पाकिस्तानी डीजीएमओ ‘थांबा…’ असे बोलले आणि पुढे शस्त्रबंदी झाली, असे खंदारे यांनी सांगितले.
पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली
दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे, त्यांची कार्यायलये आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे पाकिस्तानात (Pakistan) आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी भारतीय सैन्य पाकिस्तानात शिरेल आणि युद्ध होईल असे पाकिस्तानला वाटले होते, मात्र भारताने ऑपरेशन सिंदूर राबवताना सीमा न ओलांडता हल्ले केले. यानंतर पाकिस्तानच्या लष्कराचे अड्डेही उद्ध्वस्त केले, ज्यामुळे पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आणि त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असेही खंदारे म्हणाले.
राजकारण करणाऱ्यांना सुनावले
ऑपरेशन सिंदूरनंतर आता यात किती लोक मारले गेले? आणि लोक मारल्याचा पुरावा काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. माझ्या देशातील लोक मला पुरावे मागत असतील तर यापेक्षा मोठी ट्रॅजेडी अथवा कॉमेडी होऊ शकत नाही. तुम्हाला राजकीय फायदा उचलायचा तर उचला पण आमच्या लढाईमध्ये येऊ नका. आम्ही तुम्हाला विचारत नाही कसे लढायचे, आम्हाला लढाई लढता येते.आम्ही प्रोफेशनल आहोत,असेही खंदारे म्हणाले. (Pakistan)
Join Our WhatsApp Community