Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन

97

पाकिस्तानला (Pakistan) मदत करणारे फार कमी देश आहेत. त्यात तुर्कस्तान एक आहे. तुर्कस्तानने पाठवलेली युद्धनौका प्रत्यक्ष युद्धात भाग घेणार नाही. तो दाखवण्याचा भाग आहे. तु्र्कस्तान पाकिस्तानला मदत करत आहे, म्हणजे तो आपला शत्रूच बनला आहे. तुर्कस्तानला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या तिसऱ्या क्रमांकाला आहे. भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानला जाणे बंद केले पाहिजे. (Pahalgam Terror Attack) तुर्कस्तान पाकिस्तानला करत असलेली मदत पहाता भारतियांनी तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार (Economic Exclusion) टाकण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.

(हेही वाचा – West Bengal : “तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांकडून मिळत आहेत धमक्या” ; मुर्शिदाबाद हिंसाचारातील पिडीतेचे राज्यपालांना पत्र)

काही दिवसांपूर्वीच तुर्कस्तानच्या हवाईदलाची कार्गो विमाने दारुगोळ्याचा प्रचंड साठा घेऊन पाकिस्तानात उतरल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताचा इन्कार केला होता. परंतु, तुर्कस्तानच्या आणखी एका कृतीमुळे ते युद्धाच्या तयारीसाठी पाकिस्तानला (Pakistan Army) मदत करत असल्याचा संशय बळावला आहे. कारण तुर्कस्तानची एक युद्धनौका पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारताकडून कोणत्याही क्षणी एअर स्ट्राईक किंवा वॉटर स्ट्राईक होण्याची भीती पाकिस्तानी लष्कराला वाटत आहे. त्यामुळेच कराची हे प्रमुख बंदर सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कस्तानची अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली युद्धनौका मदतीसाठी बोलावली असावी का, याविषयी अंदाज बांधले जात आहेत. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.