मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय?

Donald Trump :    पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणानंतर अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माजी अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे.

114

Donald Trump :    पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणानंतर अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माजी अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या व्हाईट हाऊस निमंत्रणानंतर माजी अधिकाऱ्याने केलेल्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन इंटरप्राईज इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रुबिन यांनी मोठा दावा केला आहे.(Donald Trump)

(हेही वाचा जी – ७ बैठकीत PM Narendra Modi यांनी अमेरिकेला सुनावले; म्हणाले, पाकिस्तानसोबतचे युद्ध… )

माजी अधिकारी मायकल रुबिन म्हणाले, इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात झालेल्या संभाव्य कारवाईनंतर इराणमधील अण्वस्त्रसंबंधित साहित्य पाकिस्तानात हलविले जाऊ शकते. केवळ याकरिताच ट्रम्प प्रशासन पाकिस्तानचा विचार करत असल्याचा दावा रुबिन यांनी केला. विशेष म्हणजे, इस्रायल-इराण युध्दात सबंध जगाच्या नजरा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या भूमिकेकडे लागलेले आहे.

(हेही वाचा मुनीर म्हणतात, Donald Trump यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसमधील लंचची इनसाइड स्टोरी )

दरम्यान, नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची भेट घेतल्यानंतर आता जागतिक राजकारणात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. याबाबत बोलताना रुबिन म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प(Donald Trump) पाकिस्तानला अमेरिकेचा मित्र म्हणण्याचे कारण त्यांना या मैत्रीतून काही तरी साध्य करायचे आहे. तसेच, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करण्याची अमेरिकेची इच्छा असल्याचा दावाही त्यांनी केला.

कदाचित या कारणासाठी पाकिस्तानची निवड होऊ शकते?

माजी अधिकारी मायकल रुबिन म्हणाले, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करायचे झाल्यास अमेरिकेला संबंधित अण्वस्त्र साहित्य कुठे ना कुठे हलवावेच लागेल. या कारणासाठी कदाचित पाकिस्तानची निवड होऊ शकते, असा दावा मायकल रुबिन यांनी केला. दरम्यान, इराण-इस्त्रायल संघर्षात ट्रम्प प्रशासनाकडून पाकिस्तानला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागू शकते. त्यामुळे ट्रम्प(Donald Trump) आणि मुनीर यांच्या भेटीचा राजनैतिक दबावासाठीही वापर अमेरिकेकडून केला जाऊ शकतो.(Donald Trump)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.