Donald Trump : इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भाष्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला असून करार करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेने चर्चा करण्यासाठी अनेक संधी दिल्या, परंतु, इराणकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिसादाला इराणने आतापर्यंत योग्य उत्तर दिले नाही.(Donald Trump)
(हेही वाचा Operation Rising Lion : इराणवरील हल्ला का महत्त्वाचा?; पंतप्रधान नेत्यानाहू यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… )
भविष्यातील सुरक्षा लक्षात घेत इस्त्रायलने इराणच्या लष्करी व आण्विक ठिकाणांवर हवाई हल्ला केला. खुद्द इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले, इस्रायलने आता कारवाई केली नाही तर पुढच्या पिढीचे अस्तित्व धोक्यात येईल. ते पुढे म्हणाले, इराणकडे आता ०९ अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम आहे. इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून इस्त्रायल रोखेल. तसेच, इस्त्रायली सुरक्षा दलाकडून निवेदनही जारी करण्यात आले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टीमेटम
अमेरिकेने इराणला अणु कराराकरिता ६० दिवसांची मुदत दिली होती. २०१५च्या अणुकराराची पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्याच्या उद्देश्याने डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी इराणसोबत चर्चा करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. विशेष म्हणजे, इराणने अमेरिकेसोबतच्या अणु चर्चेतून माघार घेण्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर इस्रायलने इराणच्या अणु व लष्करी ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
ट्रम्प म्हणाले, “मी इराणला तडजोड करण्यासाठी अनेक संधी दिल्या. मी त्यांना कडक शब्दात सांगितले. त्यांनी शुक्रवार, १३ जूनला इराणला अणु करार स्वीकारावा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे असा इशारा दिला. इस्रायली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेशी चर्चाही रद्द केली आहे. अमेरिका जगाने पाहिलेली सर्वोत्तम आणि घातक लष्करी उपकरणे बनविते. ही शस्त्रास्त्रे इस्त्रायलकडे असून त्याचा वापर कसा करायचा हेदेखील त्यांना माहीत आहे. इराणमधील कट्टरपंथीयांकडून धाडस केले गेले. परंतु, त्यांना परिणामांची जाणीव नाही. यासंघर्षात परिस्थिती आणखी वाईट होईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले.(Donald Trump)
Join Our WhatsApp Community