diplomatic missions : भारताने सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विदेश दौऱ्यावर पाठविले आहे. या दौऱ्यात भारताचं शिष्टमंडळ विविध देशांच्या प्रतिनिधींशी दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरबाबतची माहिती देत आहे. त्यातच आता पाकिस्तानने पुन्हा एकदा खोडसाळपणा सुरु केल्याचे दिसते आहे. पाकिस्तान आता परदेशात राजनैतिक(diplomatic missions) मोहिमा पाठविण्याचा तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.(diplomatic missions)
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी विदेशात राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केली आहे. त्यानंतर आता याच भारतीय कल्पनेची नक्कल करत पाकिस्ताननेही अशा २ मोहिमा(diplomatic missions) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान आपल्या दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कुरापती मान्य न करता जागतिक पातळीवर प्रतिमा निर्मिती करण्यासाठी चाचपडताना दिसून येत आहे.
(हेही वाचा NIA : पुन्हा एकदा पडघा तपास यंत्रणेच्या रडारवर; ९ तास सुरू होते सर्चिंग ऑपरेशन, महाराष्ट्रात होता घातपाताचा कट )
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानुसार, दि. ०२ जून २०२५ पासून असा एक बहुपक्षीय शिष्टमंडळ न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि ब्रुसेल्स येथे जाईल, असे परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व बिलावल भुट्टो झरदारी करणार आहेत. तसेच, दुसरे शिष्टमंडळ(diplomatic missions) मॉस्कोला जाणार असून त्याचे नेतृत्व पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतेमी करणार आहेत, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानी सरकारच्या शिष्टमंडळांच्या भेटींचा उद्देश अलीकडच्या भारतीय आक्रमकतेवर पाकिस्तान(diplomatic missions)चा दृष्टिकोन मांडणे आहे. तसेच, संघर्ष आणि संघर्षापेक्षा संवाद आणि राजनैतिक कूटनीतीला प्राधान्य दिले पाहिजे हे देखील अधोरेखित करेल, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.(diplomatic missions)
Join Our WhatsApp Community