DGMO Meeting : पाकिस्तानकडून यापुढे कुठल्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी कबुली भारतासोबतच्या डीजीएमओ बैठकीत पाकिस्तानने दिली. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या DGMO Meetingमध्ये शस्त्रसंधीसह अन्य विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकिस्तानी डीजीएमओ कासीफ अब्दुल्ला यांच्यात हॉटलाईनवरून चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत कुठल्याही प्रकारे शस्त्रसंधी उल्लंघन होणार नाही, हे स्पष्ट केले. याआधीच भारताकडून स्पष्ट करण्यात आले की पाकिस्तानच्या डीजीएमओंनी आमच्याशी संपर्क साधला.
(हेही वाचा चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेच्या मुद्यावरच; PM Narendra Modi यांची परखड भूमिका )
विशेष म्हणजे दोन्ही देशांत पार पडलेल्या डीजीएमओंच्या चर्चेंदरम्यान पाकव्याप्त काश्मीर, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी मोठी ग्वाही डीजीएमओंच्या चर्चेवेळी पाकिस्तानकडून देण्यात आली.
पूर्वनियोजित वेळेत बदल होऊन डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची पाकिस्तानच्या डीजीएमओसोबत चर्चा पुढे ढकलण्यात म्हणजेच सायंकाळी होईल अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे डीजीएमओंच्या बैठकीत नेमकं काय चर्चा होणार यांसदर्भात मोठा खुलासा आता समोर आला आहे.